डॉ. उदय बोधनकर यांचा राष्ट्रीय सन्मान

18 Dec 2025 18:48:38
नागपूर, 
uday-bodhankar : नवजात शिशु आरोग्यसेवेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल कोम्हाडचे कार्यकारी संचालक डॉ. उदय बोधनकर यांना नॅशनल निओनॅटॉलॉजी फोरमतर्फे विशाखापट्टणम येथे आयोजित राष्ट्रीय परिषदेत अध्यक्षीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा सन्मान मागील तीन दशकांहून अधिक काळातील त्यांच्या अखंड, निःस्वार्थ व समर्पित सेवेचे द्योतक असून, नवजात शिशुंच्या आरोग्य, संरक्षण व जीवनरक्षणासाठी तसेच समुदाय व राष्ट्रीय पातळीवर नवजात आरोग्यसेवा बळकट करण्यासाठी केलेल्या त्यांच्या मोलाच्या योगदानाची पावती आहे.
 
 

NGP 
 
 
 
हा पुरस्कार राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. व्ही.सी. मनोज यांच्या हस्ते नियोजित अध्यक्ष डॉ. लालन भारती, डॉ. सोमशेखर निंबाळकर, डॉ. अमित उपाध्याय, यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला. यावेळी आयपीएचे कार्यकारी संचालक डॉ. नवीन ठाकरे, राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. वसंत खळतकर, डॉ. नीलम मोहन व इतर मान्यवर उपस्थित होते. या सन्मानाबद्दल डॉ. उदय बोधनकर यांनी सर्व मान्यवरांप्रति तसेच नवजात शिशुंच्या कल्याणासाठी आयुष्यभर केलेल्या सेवेला मिळालेल्या या मान्यतेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
Powered By Sangraha 9.0