माझी हकालपट्टी कशासाठी? : संतोष ढवळे यांचा सवाल

18 Dec 2025 20:01:23
तभा वृत्तसेवा
यवतमाळ, 
santosh-dhawale : शिवसेनेतून हकालपट्टी झाल्याची माहिती अधिकृतरीत्या नव्हे, तर हितचिंतकांकडून समजली. मात्र हकालपट्टी कोणत्या कारणाने आणि कुणी केली, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळाली नाही, अशी माहिती शिवसेनेचे ज्येष्ठ नेते संतोष ढवळे यांनी पत्रपरिषदेत दिली.
 
 
 
y18Dec-Santosh
 
 
 
संतोष ढवळे म्हणाले, 35 वर्षांपासून आपण शिवसेनेत सक्रियपणे काम करीत आहे. मी पक्षासाठी योगदान दिले आहे. आपल्याला कोणत्या कारणाने शिवसेनेतून काढण्यात आले, ही बाब जाणून घेण्याचा अधिकार आहे. शिवसेनेत कार्यरत पदाधिकाèयांना पदावरून काढले जाऊ शकते, मात्र थेट पक्षातून हकालपट्टी करण्याचा अधिकार कुणालाही नाही, असेही त्यांनी नमूद केले. 2014 आणि 2019 मध्ये विधानसभा निवडणूक लढवली आहे. एका वेळेस शिवसेनेची अधिकृत उमेदवारीही मिळाली होती. 2019 मध्ये यवतमाळ विधानसभा मतदारसंघ भाजपाकडे गेला. त्यावेळी पक्ष परवानगीने अपक्ष निवडणूक लढवल्याचे ढवळे यांनी सांगितले.
 
 
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आपल्याला नावाने व चेहèयाने ओळखतात. त्यामुळे कोणतीही कारवाई करण्यापूर्वी आपल्याला कारण विचारले जाईल, अशी अपेक्षा होती, असे ते म्हणाले. नगरपरिषद निवडणूक 2025 दरम्यान शिवसेना-काँग्रेस युतीसंदर्भात अनेक बैठका झाल्या. शेवटच्या बैठकीत युतीचा निर्णय झाला. या बैठकीला खासदार संजय देशमुख, काँग्रेसचे आमदार बाळासाहेब मांगुळकर तसेच दोन्ही पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते. त्यानंतर युतीची अधिकृत घोषणा करण्यात आली. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख किशोर इंगळे, आमदार बाळासाहेब मांगुळकर व वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते. आपणही या बैठकीत सहभागी होतो, असे ढवळे यांनी सांगितले.
 
 
मात्र युती जाहीर झाल्यानंतर अवघ्या एका रात्रीत शिवसेनेच्या पदाधिकाèयांकडून युती तुटल्याची घोषणा करण्यात आली. युती तुटण्यामागे भाजपासोबत काही ‘अर्थपूर्ण’ व्यवहार झाले की, ऐनवेळी भाजपाविषयी जिव्हाळा निर्माण झाला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही, असा आरोपही त्यांनी केला.
 
 
युतीपूर्वी शिवसेनेला 23 जागा देण्यात आल्या होत्या. मात्र युती तुटल्यानंतर शिवसेनेशी संबंध नसलेल्या उमेदवारांना उमेदवारी देण्यात आली व निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलण्यात आले, असे ढवळे यांनी सांगितले. आपण गेल्या 35 वर्षांपासून शिवसेनेशी एकनिष्ठ असल्याने शिवसेनानिष्ठ उमेदवारांची नावे सुचवली होती. मात्र ती अकारण नाकारण्यात आली. दोन एकनिष्ठ शिवसैनिकांना आपण काँग्रेसकडून उमेदवारी मिळवून दिली असून, ते उमेदवार विजयी झाले किंवा पराभूत झाले तरी शिवसेनेतच राहतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
निवडणूक काळात रोजच्या घडामोडी सेना भवनातील पदाधिकाèयांना कळवत होतो. मात्र एका पदाधिकाèयाने नाव न सांगण्याच्या अटीवर ‘संतोष, तुला शिवसेनेतून काढण्यात येईल’ असा इशारा दिला. शिवसेनेला लोकप्रतिनिधी जवळ बाळगायचा आहे, एकनिष्ठ कार्यकर्त्यांची किंमत नाही, असेही त्या पदाधिकारी म्हणाला असे ढवळे यांनी सांगितले.
Powered By Sangraha 9.0