अनिल कांबळे
नागपूर,
female-cricketer-commits-suicide : शहरातील उदयन्मुख क्रिकेटपटूने अचानक घरात गळास घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे क्रीडा जगतासह विद्यार्थी वर्तुळातही खळबळ उडाली. आर्या पंकज उमरकर (20, रामकुलर चाैक) असे मृत तरुणीचे नाव आहे.
आर्या उमरकर ही तिरपुडे महाविद्यालयातील बी.काॅम. पदवीच्या दुसऱ्या वर्षाची विद्यार्थिनी हाेती. शिक्षणासाेबतच आर्याला क्रिकेटमध्ये करीअर करायचे हाेते. त्यामुळे तिने क्रिकेट अकादमीत सराव करणे सुरु केले हाेते. वडिल पंकज उमरीकर यांचे रामकुमर चाैकात प्रिंटींग प्रेसचे दुकान आहे तर आई स्वाती या त्यांना हातभार लावतात. त्यांना आर्या आणि आनंदी या दाेन मुली आहेत. आर्या बुधवारी दुपारी 2 वाजता घराखाली असलेल्या वडिलांच्या दुकानात आली हाेती. तिचे वडील दुकानात थाेड्या वेळेत परत येताे, असे सांगून बाहेर गेले हाेते.
दरम्यान, डाेकेदुखीचा त्रास असल्याचे सांगून ती घराच्या दुसऱ्या माळ्यावरील आपल्या खाेलीत गेली. त्यावेळी तिची आई स्वाती आणि आजी दुसèया खाेलीत हाेत्या. आईने बराच आवाज दिल्यानंतरही आर्या खाेलीतून प्रतिसाद देत नव्हती. काही वेळानंतर खाेलीचा दरवाजा बंद आढळल्याने आईला संशय आला. त्यांनी दार उघडताच, आर्या गळास घेतलेल्या अवस्थेत आढळली.आईने हंबरडा ाेडला. त्यामुळे घरातील अन्य सदस्यांनी वरच्या माळ्यावर धाव घेतली. माहिती मिळताच काेतवालीचे ठाणेदार रितेश अहेर हे पथकासह घटनास्थळी पाेहाेचले. पंचनामा करत पाेलिसांनी मृतदेह मेडिकल हाॅस्पिटलमध्ये पाठवला. या प्रकरणी काेतवाली पाेलिसांनी आकस्मिक मृत्यूची नाेंद केली.
आजाेबाच्या मृत्यूमुळे खचली हाेती आर्या
आर्या ही आजाेबांची लाडकी हाेती. आर्याच्या आजाेबांचे 4 नाेव्हेंबर राेजी निधन झाले. त्यांच्या निधनानंतर आर्याच्या स्वभावात फरक जाणवत हाेता. ती काेणाशी ारशी बाेलतही नव्हती. क्रिकेटवर जीवापाड प्रेम करणाèया आर्याला संघातून वगळले हाेते, अशीही माहिती मिळत आहे. त्यामुळे तिच्या आत्महत्येमागे हे कारण तर नाही, याचाही पाेलिस शाेध घेत आहेत. ती मनातून खचली हाेती, त्यामुळे तिने आत्महत्येचा निर्णय घेतल्याचे बाेलले जाते.