युवकांचे मानसिक स्वास्थ्य बिघडण्यासाठी सोशल मीडिया जबाबदार : प्रा.मनीषा निफाडे

18 Dec 2025 18:29:51
बुलढाणा,
youth mental health, आज आधुनिक काळात प्रत्येक मनुष्य तणावग्रस्त जीवन जगत आहे मुलांचे शारीरिक स्वास्थ जेवढे महत्त्वाचे आहे तेवढे मानसिक स्वास्थ्य महत्वाचे आहे आणि इतर घटकांप्रमाणे युवकांच्या मानसिक स्वास्थ बिघडण्यासाठी सोशल मीडिया मोठ्या प्रमाणात परिणामकारक ठरत आहे... असे प्रतिपादन प्रा. मनीषा निफाड यांनी केले.स्थानिक विदर्भ महाविद्यालय बुलढाणा येथे दि १८ डिसेंबर रोजी कार्यशाळेमध्ये आधुनिक काळ व मानसिक स्वास्थ्य या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
 


6Y6U 
या कार्यशाळेचे अध्यक्ष विदर्भ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गोविंद गायकी होते.तर, प्रमुख मार्गदर्शक म्हणून एस एस जी एम महाविद्यालय कोपरगाव येथील प्राध्यापिका तथा मानसिक समुपदेशक मनीषा निफाडे ह्या होत्या. कार्यक्रमाच्या सुरुवातीला संत गाडगेबाबांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले.
 
 
प्राचार्य डॉ. गोविंद youth mental health, गायकी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये आधुनिक काळामध्ये युवकांसमोर प्रभावी प्रेरणास्थान नसल्यामुळे स्वतःचा शिल्पकार त्यांनी स्वतः व्हावे आपली मानसिकता ढळू देऊ नये अशा प्रकारचे मोलाचे मार्गदर्शन यावेळी विद्यार्थ्यांना केले.या कार्यशाळेचे आयोजन प्राचार्यांच्या मार्गदर्शनाखाली अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ सौ. संगीता पवार यांनी केले होते. महाविद्यालयातील प्राध्यापक व बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. वैभव वाघमारे तर, आभार प्रदर्शन प्रा. डॉ.संगीता पवार यांनी केले.
Powered By Sangraha 9.0