नागपूर,
Atharva Sangeet Vidyalaya अथर्व संगीत विद्यालयाच्या पंचवीस वर्षांच्या सुरसाधनेनिमित्त रजत महोत्सवाचा भव्य व सुरेल कार्यक्रम साई सभागृह, शंकर नगर येथे उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात राग जोग फ्यूजनमधील गणेश वंदनेने झाली. विद्यालयातील लहानांपासून ज्येष्ठ विद्यार्थ्यांपर्यंत सर्वांनी सुरेल व भावपूर्ण गायन सादर करून रसिकांची मने जिंकली. कार्यक्रमाचे बहारदार व प्रभावी संचालन विजय जथे यांनी केले.
या कार्यक्रमात शास्त्रीय संगीत, भावगीत, भक्तिगीत तसेच लोकप्रिय हिंदी-मराठी गीतांची सुंदर सांगड घालण्यात आली. वेदांत जगदळे यांच्या शास्त्रीय गायनासह विविध विद्यार्थ्यांच्या सादरीकरणांना प्रेक्षकांकडून भरभरून दाद मिळाली. Atharva Sangeet Vidyalaya विशेषतः गृहिणी विद्यार्थिनींच्या सादरीकरणाने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. रविंद हरदास होते. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. कमलेश मदनकर, डॉ. अपर्णा मदनकर, डॉ. आशय केकतपुरे, डॉ. अनघा कुलकर्णी-केकतपुरे तसेच डॉ. वर्षा वर्मा तिवारी उपस्थित होते. अथर्व संगीत विद्यालयाचे संस्थापक व संचालक, शास्त्रीय गायक विकास जगदळे यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या २५ वर्षांपासून संगीतसंस्कारांची परंपरा जपली जात असल्याबद्दल मान्यवरांनी गौरवोद्गार काढले. Atharva Sangeet Vidyalaya कार्यक्रमाचा समारोप देशभक्तीपर गीताने करण्यात आला.
सौजन्य: विजय जथे, संपर्क मित्र