प्रधानमंत्री आवास योजनेत उत्कृष्ट काम : सीईओ चौहान

19 Dec 2025 16:51:51
वाशीम, 
pradhan mantri awas yojana जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजनेचे काम उत्कृष्ट असल्याचे उद्गार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चौहान यांनी काढले. प्रधानमंत्री आवास योजना टप्पा १ आणि २ तसेच राज्य पुरस्कृत घरकुल योजना अंतर्गत जिल्ह्यातील घरकुलांच्या कामाचा सविस्तर आढावा घेण्यासाठी सीईओ चौहान यांनी स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, सहायक प्रकल्प अधिकारी, ग्रामीण गृहनिर्माण अभियंता आणि संगणक परिचालक यांची बैठक १८ डिसेंबर रोजी आयोजित केली होती.
 
 
 
आवास योजना
 
 
 
यावेळी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक तथा अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी किरण गणेश कोवे, जिल्हा ग्रामिण विकासचे सहायक प्रकल्प अधिकारी तथा जलजीवन मिशनचे प्रकल्प संचालक धैर्यशील पाटील यांची उपस्थिती होती.
मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी प्रलंबित असलेल्या कामांना गती देण्याचे निर्देश तालुकास्तरावर कार्यरत यंत्रणेला दिले तसेच प्रलंबित असलेले घरकुलाचे कामे तात्काळ पूर्ण करण्याची ताकीद दिली. प्रधानमंत्री आवास योजनेचे जिल्ह्याचे उद्दिष्ट ६९२१२ असून, यापैकी ६४२४३ लाभार्थ्यांना पहिल्या हप्त्याचे वितरण करण्यात आले आणि यापैकी ३४०६७ लाभार्थ्यांचे मस्टर (हजेरीपत्रक) काढण्यात आले आहेत.
घरकुलाचा कोणताही लाभार्थी घरापासून वंचित राहू नये याची विशेष दक्षता घेण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिले. ज्या कुटुंबांना घर बांधण्यासाठी स्वतःची जागा नाही त्यांना ग्रामपंचायत मार्फत शासकीय जागा उपलब्ध करून देणे, अतिक्रमण नियमानुकूल करणे, गावातील नातेवाईकांची जागा मिळवून देणे हे पर्याय वापरून घरकुलाकरिता जागा उपलब्ध करून देण्याची निर्देशही यावेळी देण्यात आले.
सहाय्यक प्रकल्प अधिकार्‍यांचा सत्कार
प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत उत्कृष्ट काम करणारे नरेगा चे सहाय्यक प्रकल्प अधिकारी संदीप ज्ञानेश्वर खिल्लारे (जिल्हा परिषद वाशीम) आणि संजय गणेश राऊत (पंचायत समिती, कारंजा) यांचा मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चौहान यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.pradhan mantri awas yojana ए.पी.ओ. संजय राऊत यांनी कारंजा तालुक्यातील ५०४७ पैकी ४४३६ मस्टर (८८ टक्के) काढले आहेत. या कमी त्यांना जिल्हास्तरावर कार्यरत ए.पी.ओ. संदीप खिल्लारे यांची मदत झाली.
Powered By Sangraha 9.0