शेतकऱ्यांना 6 हजार नाही, 12 हजार मिळणार?

19 Dec 2025 15:12:12
नवी दिल्ली,
Farmers will receive 12,000 २०१९ मध्ये शेतकऱ्यांसाठी पीएम किसान योजना सुरू करण्यात आली. या योजनेअंतर्गत आतापर्यंत २१ हप्ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा केली गेली आहेत. या काळात जवळपास ४.०९ लाख कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत. पीएम किसान योजनेत शेतकऱ्यांना वार्षिक ६,००० रुपये मिळतात, जे तीन हप्त्यांमध्ये थेट खात्यात जमा होतात. या योजनेचा लाभ अल्पभूधारक शेतकऱ्यांना मिळतो, तर जास्त उत्पन्न असणाऱ्या शेतकऱ्यांना हा लाभ मिळत नाही.
 
 

kisan yojana 
डिसेंबर २०२४ मध्ये संसद समितीने शिफारस केली होती की पीएम किसान योजनेत शेतकऱ्यांना मिळणारी वार्षिक रक्कम ६,००० रुपयांऐवजी १२,००० रुपये केली जावी. यामुळे नवीन वर्षात शेतकऱ्यांच्या खात्यात १२,००० रुपये जमा होण्याची शक्यता चर्चा सुरू झाली होती. या दृष्टीने २२ वा हप्ता फेब्रुवारी २०२६ मध्ये जमा होण्याची शक्यता वर्तवली जात होती.
 
 
तथापि, शेतकरी कल्याण मंत्रालयाचे राज्य मंत्री रामनाथ ठाकूर यांनी यासंबंधी स्पष्ट केले आहे की सध्या सरकारकडे ही रक्कम वाढवण्याचा कोणताही प्रस्ताव आलेला नाही. त्यामुळे सध्या शेतकऱ्यांना मिळणारी वार्षिक रक्कम ६,००० रुपये कायम राहणार आहे. योजनेत नवीन अटी म्हणून ‘फार्मर आयडी’ची अट लागू करण्यात आली आहे. ज्या राज्यात फार्मर आयडीची प्रक्रिया सुरू आहे, त्या राज्यातील शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी हा आयडी आवश्यक आहे. सध्या एकूण १४ राज्यांमध्ये ही प्रक्रिया सुरू आहे. ज्या राज्यात फार्मर आयडीची प्रक्रिया अद्याप सुरू झालेली नाही, तिथल्या शेतकऱ्यांना सध्या या अटीतून सवलत देण्यात आली आहे, सरकारने नुकताच २१ वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केलेला आहे, आणि आता २२ वा हप्ता फेब्रुवारी २०२६ मध्ये येण्याची प्रतीक्षा आहे.
Powered By Sangraha 9.0