नितेश कराळे विरोधात गुन्हा दाखल करा

19 Dec 2025 20:04:28
हिंगणघाट, 
Nitesh Karale : नाशिक येथे कुंभमेळ्यासाठी येणार्‍या साधू संतांवर टीका केल्या बद्दल आणि हिंदू धार्मियांच्या भावना दुखावल्याबद्दल शरद पवार गटाचे प्रवता नितेश कराळे याच्यावर दखलपात्र गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीचे निवेदन विश्व हिंदू परिषदेच्या वतीने पोलिस स्टेशन हिंगणघाट येथे देण्यात आले.
 
 
 
JLK
 
 
 
नितेश कराळे शिक्षक पेशात असून सुद्धा नेहमी हिंदू धर्माबद्दल, हिंदू साधू संताबद्दल, हिंदू पारंपरिक सणाबद्दल नेहमी चुकीचे विधान करतो. कराळे यांनी हिंदू साधू संतांना गांजा पिण्यासाठी कुंभ मेळ्यात येतात असे बेजबाबदार आणि हिंदू विरोधी विधान केले. त्याच्या या विधानावर वर्धा येथे सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नितेश कराळे याच्या विरोधात सर्व जिल्ह्यातील पोलिस स्टेशनला दखलपात्र गुन्हा नोंदवा असे आवाहन विहिंप वर्धा जिल्हा सहमंत्री शरद कोणप्रतिवार यांनी केले आहे.
 
 
निवेदन देतांना देवा वाघमारे, संजय भोंग, सुरेश बुराडकर, धर्मा जोशी, राहुल फटिंग, सुरज वरठी, मारोती सहारे, संदीप नासरे, अतुल त्रिवेदी, नरेश भडे आणि विहिप बजरंग दल पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0