महाप्रसादासाठी गेलेल्या युवकाचा पाण्याच्या टाकीत आढळला मृतदेह

19 Dec 2025 20:56:10
हिंगणघाट, 
dead-body-in-water-tank : शहरातील टिळक चौक परिसरातील आनंद गिरी यांचा मुलगा दक्षगिरी काल गुरुवार १८ रोजी सायंकाळी टिळक चौकात होणार्‍या महाप्रसादासाठी घरातून होता. मात्र, तो उशिरापर्यंत घरी न परतल्याने कुटुंबीयांनी त्याचा शोध घेतला. आज शुक्रवार १९ रोजी डागा मील गिरणी परिसरातील पाण्याच्या टाकीत त्याचा मृतदेह तरंगताना आढळून आला. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचत पंचनामा केला. मृत्यूचे नेमके कारण कळू शकले नाही.
 
 

K 
Powered By Sangraha 9.0