अल्पवयीन मुलीचा विनयभंग, दोन आरोपींना अटक

19 Dec 2025 17:13:30
रिसोड,
Risod police arrest, बुलढाणा जिल्ह्यातील एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी दोन युवका विरोधात रिसोड पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करून दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. सदर घटना १७ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता घडली. शुभम अरुण इंगोले (वय २०) व गौरव उर्फ चिया (वय २५) दोघेही राहणार लोणी ता.रिसोड जि.वाशीम असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
 

minor girl molestation case, Risod police arrest, Buldhana crime news 
याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार बुलढाणा जिल्ह्यातील एका १७ वर्षीय युवतीने रिसोड पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, रिसोड तालुयातील लोणी येथील शुभम अरुण इंगोले गौरव उर्फ चिया दोघांनीही लोणी येथे मैत्रिणी सोबत जात असता तिला अडवले व गौरव व चियाने तिचा वाईट उद्देशाने हाथ धरला व तुझ्यावर प्रेम करतो असे म्हणू लागला. यावर सदर पिडिताने विरोध केला असता तो काही हात सोडायला तयार नव्हता. यावेळी पीडीतेच्या काही मैत्रिणी त्या ठिकाणी होत्या त्यांनी सुद्धा सदर आरोपींचा प्रतिकार केला असता पिडितेला थापडांनी मारहाण केली व तसेच पीडितेच्या मैत्रिणीला लोटालोट केली. सदर बाब कोणाला सांगितली तर जीवाने मारून टाकीन अशी धमकी दिली.
याप्रकरणी पोलिसांनी कलम ७४,७५,११५,३५१(३),३५२,३(५) सह कलम ८,१२ पोस्को (जुने कलम- ३५४,३५४ (अ),३२३,५०४, ५०६, ३४ भादवी) प्रमाणे दोन्ही आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करून दोघांनाही रिसोड पोलिसांनी अटक केली आहे. सदर प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार रामेश्वर चव्हाण यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक नागरे करीत आहेत.
Powered By Sangraha 9.0