नवीन शैक्षणिक धोरण सर्वसमावेश

19 Dec 2025 21:00:16
अमरावती,
nirvan-birla : केंद्र सरकारचे नवीन शैक्षणिक धोरण सर्वसमावेश असून त्याची योग्य अंमलबजावणी होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन बिर्ला एज्युकेशन ग्रुपचे संस्थापक निर्वान बिर्ला यांनी केले.
 
 
 
L;
 
 
 
अमरावती येथील बिर्ला ओपन माइंड्स इंटरनॅशनल स्कूलच्या वार्षिक कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी ते आले असता त्यांनी शनिवारी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी बिर्ला ओपन माइंड्स इंटरनॅशनल स्कूल, अमरावती व श्रीमंत योगी एज्युकेशन अ‍ॅण्ड वेलफेअर ट्रस्टचे अध्यक्ष सुधीर वाकोडे, उपाध्यक्ष आशिष, प्राचार्या सुनीता, बिर्ला ओपन माइंड्स इंटरनॅशनल स्कूलचे मुख्य कार्यकारी अधिकारी मुकेश मिश्रा यांच्यासह अन्य उपस्थित होत. निर्वान बिर्ला पुढे म्हणाले, सर्वस्तरातल्या मुलांना उच्च दर्जाचे शिक्षण मिळावे, या शुद्ध हेतूने बिर्ला कुटुंबाने शिक्षण क्षेत्रात पाऊल टाकले आहे. त्या दिशेनेच प्रवास सुरू असून देशभरात बिर्ला स्कूलच्या २०० शाळा आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत १० शाळा सुरू झाल्या असून येत्या तीन वर्षात आणखी ५० शाळा सुरू करण्याचा मानस आहे. अभियांत्रिकी, संगणकीय, वैद्यकीय व अन्य शिक्षण इतर देशांच्या तुलनेत भारतातच चांगले आहे. त्यामुळेच आपल्या विद्यार्थांना रोजगाराच्या चांगल्या संधी विदेशात उपलब्ध होतात.
 
 
विदेशातल्या शिक्षणाच्या बाबतीतले एक उदाहरण देताना ते म्हणाले, आपल्याकडे जो अभ्यासक्रम ११ वी किंवा १२ वीत असतो, तो इंग्लड किंवा अन्य ठिकाणी पदवी अभ्यासक्रमाला असतो. सांगायचा मुद्दा इतकाच की, आपले शिक्षण पुढच्या पायरीवरचे आहे. नवीन शैक्षणिक धोरणानेतर भारतातले शिक्षण अधिक व्यापक होणार आहे. पुस्तकी ज्ञानासोबतच व्यावहारीक ज्ञान आणि आवडीचे विषय शिकण्याचे स्वातंत्र्य त्यात मिळाले आहे. फक्त या नव्या धोरणाची अंमलबजावणी योग्य पद्धतीने होणे गरजेचे असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.
Powered By Sangraha 9.0