नोएडा,
noida bomb threat नोएडामधील एका शाळा आणि मॉलमध्ये बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी देणारा आणखी एक ईमेल प्राप्त झाला आहे. माहिती मिळताच पोलिसांनी शाळा परिसर आणि मॉलमध्ये शोध मोहीम सुरू केली. बॉम्बनाशक पथकाच्या मदतीने देखील शोध मोहीम राबवण्यात आली.
पोलिस धमकी देणाऱ्या ईमेलचा स्रोत शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.noida bomb threat आतापर्यंत शोध मोहिमेत काहीही संशयास्पद आढळले नाही. अतिरिक्त पोलिस आयुक्त राजीव कुमार मिश्रा यांनी सांगितले की, धमकी देणारा ईमेल मिळाला आहे आणि तपास सुरू आहे.