पारंपारीक चिकीत्सा पध्दतीला आधुनिकतेची जोड देऊन निरोगी आयुष्याचा संकल्प : प्रतापराव जाधव

19 Dec 2025 18:27:16
बुलढाणा,
Prataprao Jadhav, पारंपारीक चिकीत्सा पध्दतीला आधुनिकतेची जोड देऊन निरोगी आयुष्याच्या संकल्पनेसाठी पारंपारीक औषधांचा उपयोग जगाच्या कल्याणासाठी करुया. असा दृढ संकल्प केंद्रिय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी औषध शिखर परिषदेत व्यक्त केला.
 

Prataprao Jadhav, 
जागतीक Prataprao Jadhav, आरोग्य संघटनेच्या वतीने दुसरी जागतीक पारंपारीक औषध शिखर परिषदेचे उदघाटन १७ डिसेंबर ला दिल्ली येथे झाले. या शिखर परिषदेत मार्गदर्शन करतांना आयुष मंत्री प्रतापराव जाधव बोलत होते. यावेळी व्यासपिठावर आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री जेपी नड्डा, आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री जेपी नड्डा , दक्षीण आफ्रीकेचे आरोग्य मंत्री आरोन मोत्सो आलेदी, आयुष विभागाचे सचिव वैद्य, राजेश कोटेचा डब्ल्यु एच ओ, जि.टी.एम.सी. चे संचालक डॉ.श्यामा कुरुविल्ला, डी.जी. डब्ल्यु एच ओ चे वरीष्ठ सल्लागार डॉ.कथरीना बोहेम उपस्थित होते.
 
 
यावेळी बोलतांना केंद्रिय आयुष मंत्री प्रतापराव जाधव म्हणाले की पारंपारीक औषध पध्दतीचा उपयोग हा आधुनिक विज्ञानाच्या सहाय्याने करुन भविष्याचा पाया रचण्याचे कामही औषध शिखर परिषद करणार आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय आयुर्वेदिक परंपरेला विकसीत करण्यासाठी २०१६ ला जागतीक आरोग्य संघटनेच्या मदतीने भारतात आयुष मंत्रालय सुरु केले. या मंत्रालयाच्या वतीने आयुर्वेद, सिध्दा, योगा आणि युनानी उपाचारात नाविण्यपुर्ण ग्लोबल ट्रेडिशनल मेडीसीन सेंटर तयार करण्यासाठी काम केल्या जात आहे.
भारतात दरवर्षी Prataprao Jadhav, परदेशी विद्यार्थांना आयुर्वेद, योगा, युनानी आणि इतर प्रणालीचा अभ्यास करण्यासाठी १०४ प्रकारच्या शिष्यवृत्या देण्यात येतात. आतापर्यंत भारताने २६ देशांसोबत सामंजस्य करार केले आहे. जगातील ५० हुन अधिक संस्थेंसोबत सहयोग केला आहे. १५ विद्यापिठांमध्ये आयुष विभागाची स्थापना करण्यात आली आहे. ४३ देशांमध्ये आयुष माहिती केंद्र स्थापन करण्यात आले आहे. युके मध्ये अश्वगंधा चाचणी, जर्मनीमध्ये गुडूचा अभ्यास आणि लातविया मध्ये मधुमेह (डायबेटीज) आयुर्वेदीक अभ्यासाचा समावेश आहे. हा अभ्यास प्राचीन ज्ञान आणि आधुनिक विज्ञानाशी जोडला गेला आहे. जग हे कुटूंब आहे. या कुटूंबाच्या निरोगी आयुष्यासाठी भारत हा वचनबध्द आहे. सहयोगी देशांच्या सहकार्याने मतदीने आधुनिक विज्ञानाचा उपयोग करुन आयुष प्रणाली मजबुत करण्यासाठी काम करणार आहे. पारंपारीक औषधांचा उपयोग नागरीकांच्या निरोगी आरोग्य कल्याणासाठी करुया असा दृढ विश्वास आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी या शिखर परिषदेत मनोगत व्यक्त करतांना केला.
Powered By Sangraha 9.0