रेशन धान्य वाटपात बदल

19 Dec 2025 17:06:25
कारंजा लाड,
ration distribution change राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम २०१३ अंतर्गत दिल्या जाणार्‍या रास्त दर धान्याच्या मासिक वाटपात पुन्हा एकदा बदल करण्यात आला असून, हा बदल जानेवारी २०२६ पासून लागू होणार आहे. या बदलानुसार अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य कुटुंब लाभार्थी यांना मिळणार्‍या तांदूळ व गहूच्या प्रमाणात सुधारणा करण्यात आली आहे. हा बदल राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियमातील मूळ तरतुदींनुसार करण्यात येत असून त्यामुळे धान्य वितरणात पुन्हा संतुलन साधले जाणार आहे.
 

ration distribution change 
अंत्योदय शिधापत्रिकाधारक ration distribution change लाभार्थ्यांना प्रती शिधापत्रिका २० किलो तांदूळ आणि १५ किलो गहू तर प्राधान्य कुटुंब लाभार्थी यांना प्रति सदस्य दरमहा ३ किलो तांदूळ आणि २ किलो गहू मिळणार आहे. पुरवठा विभागाने स्पष्ट केले आहे की डिसेंबर २०२५ या महिन्यासाठी सध्या लागू असलेलेच धान्य वितरण प्रमाण कायम राहणार आहे. त्यानुसार अंत्योदयसाठी २० किलो तांदूळ १० किलो गहू मिळेल. तर प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना प्रति सदस्य ४ किलो तांदूळ आणि १ किलो गहू दिल्या जाईल. याआधी काही काळासाठी करण्यात आलेल्या तात्पुरत्या बदलात तांदळाचे प्रमाण वाढवून गहू कमी करण्यात आला होता. यामुळे काही भागांत तांदळाची जास्त मागणी असल्याने समाधान व्यक्त झाले. मात्र, गहू कमी झाल्याने अनेक कुटुंबांना अडचणींचा सामना करावा लागला. जानेवारी २०२६ पासून नवीन प्रमाण लागू होणार असल्याने, शिधापत्रिकाधारकांनी आपल्या रेशन कार्डवरील सदस्य संख्या, मिळणारे धान्य आणि दुकानावर होणारे वितरण याची खात्री करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. त्यानुसार रास्त दर दुकानांवर नियोजन केले जाणार आहे.
 
 
 
गरिबांसाठी रेशन व्यवस्था म्हणजे जीवनरेषा
गरीब, गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांसाठी रेशन व्यवस्था ही जीवनावश्यक आधारव्यवस्था आहे. त्यामुळे धान्य वाटपात होणारे बदल त्यांच्या दैनंदिन जीवनावर थेट परिणाम करणारे ठरतात. जानेवारी २०२६ पासून तांदूळ-गहूचे संतुलित वाटप सुरू होणार असून, राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियमाच्या मूळ उद्दिष्टांची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे होणार आहे.
Powered By Sangraha 9.0