तमिळनाडूत SIR चे आकडे जाहीर; ९७ लाख मतदारांची नावे यादीतून वगळली

19 Dec 2025 18:52:03
चेन्नई,  
sir-in-tamil-nadu तमिळनाडूमध्ये मतदार यादी स्वच्छ आणि अद्ययावत करण्यासाठी राबवण्यात आलेल्या विशेष सखोल पुनरिक्षण मोहिमेनंतर (स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन(SIR)) मोठ्या प्रमाणावर नावे वगळण्यात आली आहेत. राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी अर्चना पटनायक यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रक्रियेत तब्बल ९७ लाख ३७ हजारांहून अधिक मतदारांची नावे यादीतून काढून टाकण्यात आली आहेत. यामुळे राज्यातील एकूण मतदारसंख्या ६.४१ कोटींवरून थेट ५.४३ कोटींवर आली आहे.
 
sir-in-tamil-nadu
 
ही विशेष मोहीम मागील महिन्यात ४ तारखेपासून सुरू करण्यात आली होती. सुरुवातीला ही प्रक्रिया याच महिन्यात ४ तारखेपर्यंत चालणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते, मात्र नंतर कालावधी वाढवण्यात आला. या अंतर्गत मतदारांना ‘एसआयआर’ अर्ज भरून १४ डिसेंबरपर्यंत सादर करण्याची संधी देण्यात आली होती. sir-in-tamil-nadu या सर्व प्रक्रियेनंतर आज जिल्हानिहाय मसुदा मतदार यादी जाहीर करण्यात आली आहे. चेन्नई येथे पत्रकारांशी बोलताना अर्चना पटनायक यांनी सांगितले की, राज्यभरात एकूण मतदारांच्या सुमारे १५ टक्के नावे वगळण्यात आली आहेत. यामध्ये मृत मतदारांच्या नावांची संख्या जवळपास २७ लाख असून, दुहेरी नोंदणीमुळे सुमारे साडेतीन लाख नावे काढण्यात आली आहेत. याशिवाय तब्बल ६६ लाखांहून अधिक मतदार हे राज्याबाहेर स्थलांतरित झाल्याचे आढळून आल्याने त्यांची नावे हटवण्यात आली.
या पुनरिक्षणापूर्वी तमिळनाडूमध्ये ६ कोटी ४१ लाखांहून अधिक मतदार नोंदणीकृत होते. आता सुधारित यादीनुसार राज्यात ५ कोटी ४३ लाख ७६ हजारांहून थोडे अधिक मतदार शिल्लक आहेत. यामध्ये महिला मतदारांची संख्या सुमारे २ कोटी ७७ लाख आहे, तर पुरुष मतदार सुमारे २ कोटी ६६ लाख आहेत. sir-in-tamil-nadu तृतीयपंथीय मतदारांची संख्या सुमारे सात हजारांहून अधिक असून, दिव्यांग मतदारांची संख्या सुमारे सव्वाचार लाखांच्या आसपास आहे. मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, या संपूर्ण मोहिमेचा उद्देश मतदार यादी अधिक पारदर्शक, अचूक आणि अद्ययावत करणे हा आहे. निवडणूक प्रक्रियेत केवळ पात्र मतदारांनाच मतदानाचा अधिकार मिळावा, यासाठी ही कारवाई आवश्यक होती, असेही त्यांनी नमूद केले.
Powered By Sangraha 9.0