नागपूर,
Commissioner office डॉ. स्मिता दाभोळकर यांनी लोकमान्य कन्व्हेंटमधील विद्यार्थ्यांना कमिश्नर कार्यालय आणि राजभवनात घेऊन जाऊन त्याची माहिती दिली. कमिश्नर कार्यालयात विद्यार्थ्यांनी आयुक्त विजया लक्ष्मी बिदारी यांची भेट घेतली. विद्यार्थ्यांनी आयुक्तांना प्रश्न विचारले, त्यावर आयुक्तांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या आयुष्यात पुढे जाण्यासाठी आणि आयुक्त होण्यासाठी काय मेहनत घ्यावी लागते हे समजावून सांगितले तसेच विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
नंतर राजभवनात विद्यार्थ्यांना येवले सरांशी भेट करून दिली. त्यांनी राजभवनाची माहिती दिली आणि विद्यार्थ्यांना काही प्रश्न विचारले. Commissioner office विद्यार्थ्यांनी मनापासून उत्तरे दिली, ज्यामुळे त्यांना खूप शिकायला मिळाले, तसेच त्यांनी येवले सरांचे आभार मानले. लोकमान्य कन्व्हेंटच्या प्राचार्य संगीता लाडखेडकर यांनी डॉ. स्मिता दाभोळकर आणि त्यांना सहकार्य करणाऱ्या मिलिंद देशकर यांचे आभार मानले.
सौजन्य: मीनाक्षी देशपांडे, संपर्क मित्र