समुद्रपूर,
sameer-kunavar : तालुक्यातील गिरड खुर्सापार परिसरात ११ महिन्यापासून वास्तव्यास असलेल्या वाघीण, तिन पिल्ले आणि एक वाघ अशा ५ वाघांनी शेतकरी, शेतमजूर व नागरिकांमध्ये चांगलीच दहशत निर्माण केली. आतापर्यंत या वाघांनी मनुष्याला इचा पोहोचवली नसली तरी शेकडो पाळीव जनावरांना ठार केले आहे. त्यातील एका वाघाला ३१ डिसेंबरपर्यंत जेरबंद करण्याची परवानगी मिळाली आहे. वन विभागाकडून या वाघा जेरबंद करण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. आता त्या वाघांना जेरबंद करण्यासाठी नागपूर आणि वर्धा जिल्ह्यातील वन विभागाच्या वतीने संयुक्त मोहीम राबवण्यात येणार आहे.

तीन महिने लोटून देखील वाघ वनविभागाच्या हाती अद्याप लागला नाही. एक वाघ इतका चतूर आहे की त्याला पकडण्याची भनक लागताच तो नागपूर जिल्ह्यातील जंगलात पलायन करीत आहे. वनसंरक्षक नागपूर यांच्याकडून वर्धा व नागपूर जिल्ह्यातील वनविभाच्या चमुला संयुत कारवाई करुन वाघाला जेरबंद करण्याचे आदेश देण्यात आले आहे. आ. समीर कुणावार यांनी वनमंत्री गणेश नाईक यांच्याशी फोनवर चर्चा करून वाघाला तात्काळ जेरबंद करण्याची मागणी केली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हिंगणघाट येथे आले असता त्यांना या ५ वाघांविषयी माहिती देत तातडीने जेरबंद करण्याचे निदर्शन देण्याची मागणी निवेदनातून केली होती.
१० डिसेंबरला नागपूर येथील हिवाळी अधिवेशनादरम्यान वनमंत्री गणेश नाईक, आ. समीर कुणावार यांच्यासह वनविभाच्या वरीष्ठ अधिकार्यांची बैठकीत आमदार कुणावार यांनी गिरड परिसरातील वांघाचा मुद्दा उपस्थित करून तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी लावून धरली होती. ३ महिन्यापासून उपवनसंरक्षक हरबिदर सिंग, वनपरिक्षेत्र अधिकारी नीलेश गावंडे यांच्या मार्गदर्शनात वाघाला पकडण्यासाठी ५० वर वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी वाघाच्या मार्गावर असून जंगल परिसरात शेकडो स्ट्राप कॅमेर्यासह सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहे. २ ड्रोन कॅमेरे सुद्धा रोज जंगल परिसरात घिरट्या घालत आहे. वर्धा जिल्ह्यातील वाघाला नागपूर हद्दीत पकडण्याचा कायदेशीर पेच निर्माण झाला होता. मात्र, आ. कुणावार यांच्या पाठपुराव्यामुळे तोडगा काढण्यात आला असून यासंबंधी वनसंरक्षक नागपूर यांच्या आदेशावरून गिरड येथील कार्यालयात समुद्रपूर येथील वनपरिक्षेत्र अधिकारी नीलेश गावंडे, बुट्टीबोरी येथील वनपरिक्षेत्र अधिकारी वाडे यांच्या उपस्थितीत दोन्ही जिल्ह्यातील अधिकारी व कर्मचार्यांनी बैठक घेऊन संयुत मोहीम राबवून वाघाला जेरबंद करण्याची रणनीती ठरविण्यात आली आहे.