वाशीम नप अध्यक्ष व ३२ नगरसेवक पदासाठी मतदान आज

19 Dec 2025 16:48:33
वाशीम,
washim municipal council वाशीम नगर परिषद अध्यक्ष व १६ प्रभागातील ३२ नगरसेवक पदासाठी आज, २० डिसेंबर रोजी मतदान होणार असून, त्यासाठी प्रशासकीय यंत्रणा पूर्णपणे सज्ज झाली आहे. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी १९ डिसेंबर रोजी उमेदवारांनी रॅली काढून मतदारांना आकर्षीत करण्याच्या दृष्टीने शक्तीप्रदर्शन केले. शहरातील ८१ मतदान केंद्रावर मतदान होणार असून, त्यासाठी चोख पोलिस बंदोबस्त लावला आहे.
 
 
nagar parishad
 
 
वाशीम नगर परिषद अध्यक्षपद हे ओबीसी (सर्वसाधारण) राखीव आहे. त्यासाठी भाजपा पक्षाकडून अनिल केंदळे, शिवसेना उबाठा गटाकडून रेखा सुरेश मापारी, राकाँ अजित पवार गटाकडून संदीप दहात्रे, वंचित बहुजन आघाडीच्या वतीने वैभव उलेमाले, आप पक्षाकडून सागर कोकास यासह एमआयएम व अपक्ष असे ८ उमेदवार अध्यक्षसाठी निवडणुक रिंगणात आहे. एक अध्यक्ष व ३२ सदस्य निवडून देण्यासाठी एकूण ७५,०७० मतदार आपला हक्क बजावणार आहे. नप निवडणुक रिंगणातील उमेदवारांनी अत्याधुनिक प्रचार साधनाचा यंत्रणेचा वापर केला. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी सर्वच पक्षाच्या उमेदवारांनी शहरातील प्रमुख मार्गावरुन रॅलीद्वारे शक्तीप्रदर्शन केले. निवडणुक प्रचार दरम्यान सर्वच पक्षाच्या उमेदवारांनी मतदारांना आकर्षीत करण्यासाठी विविध लुप्त्याचा वापर केला.
वाशीम शहरातील ८१ मतदान केंद्रावर मतदानाची सुविधा करण्यात आली आहे. वृध्द, दिव्यांग बांधवांचे मतदान करुन घेण्यासाठी प्रशासनाने चोख नियोजन केले आहे. मतदानाची टक्केवारी प्रशासनाने ठिकठिकाणी जनजागृती केली. मतदान केंद्राच्या ठिकाणी चोख पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे.washim municipal council २० डिसेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मतदानाची वेळ असली तरी मतदान केंद्राच्या आत असलेल्या मतदारांचे मतदान करुन घेण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न राहणार आहे. २१ डिसेंबर रोजी वाशीम जिल्ह्यातील वाशीम, रिसोड, मंगरुळनाथ, कारंजा या नगर परिषद व मालेगाव नगर पंचायतची मतमोजणी होणार असून, मतदारांनी आपला कौल कोणाला दिला हे कळणार आहे.
Powered By Sangraha 9.0