हिंगणघाट,
the-burning-truck : येथील नांदगाव मार्गावरील सेंट जॉन्स कॉन्व्हेंट समोर ‘द बर्निंग ट्रक’ची घटना मध्यरात्री १२.३० वाजताच्या सुमारास घडली. वाहनातून धूर निघत असल्याचे लक्षात येताच चालकाने प्रसंगावधान दाखवत वेळीच वाहनाबाहेर उडी घेतल्याने तो बचावला.
शहरातून नांदगाव मार्गावरील सेंट जॉन्स कॉन्व्हेंटपुढून जाताना एम. एच. ४० सी. एम. ७४११ क्रमांकाच्या ट्रकमधून धूर निघत असल्याचे लक्षात आल्यावर चालक संकल्प डंभारे याने त्याच्या ताब्यातील वाहन रस्त्याच्या कडेला लावून वाहनाबाहेर उडी मारली. येथील अग्निशमन विभागाच्या जवानांना माहिती दिली. माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान अग्निशमन बंबासह घटनास्थळी दाखल झाले. पण तोवर आगीने ट्रकला बर्यापैकी आपल्या कवेत घेतले होत. अग्निशमन दलाच्या जवानांनी जळल्या ट्रकवर पाण्याचा मारा करून सुमारे एक तासांच्या शर्तीच्या प्रयत्नांती आगीवर नियंत्रण मिळविले. या आगीत ट्रकचा कोळसा झाला असून मोठे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले. या घटनेची नोंद पोलिसांनी घेतली आहे.