वर्धेत विशेष मोहिमेत १८८ नवे कुष्ठरुग्ण!

19 Dec 2025 20:21:33
वर्धा, 
leprosy-patients : जिल्ह्यात १७ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर या काळात कुष्ठरुग्ण शोध मोहीम राबविण्यात आली. तब्बल १३.५७ लाख जणांची तपासणी केल्यावर १२ हजार २६२ संशयित आरोग्य विभागाला गवसले. त्यानंतर या संशयितांची तपासणी आरोग्य यंत्रणेतील तज्ज्ञांनी केल्यावर तब्बल १८८ नवे कुष्ठरुग्ण आढळले आहे. या नवीन कुष्ठरुग्णांना उपचाराखाली आणण्यात आले आहे.
 
 
J
 
 
जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात आरोग्य यंत्रणेतील कुष्ठरोग विभागाच्या वतीने १७ नोव्हेंबरपासून कुष्ठरोग शोध मोहीम राबविण्यास सुरूवात झाली. शहरी व ग्रामीण भागात राबविण्यात आलेल्या मोहिमेदरम्यान १३ लाख ५७ हजार नागरिकांची तपासणी करण्यात आली. याच तपासणीत १२ हजार २६२ संशयित गसवले. या संशयितांची तज्ज्ञांकडून तपासणी केल्यावर १८८ नवीन कुष्ठरुग्ण आढळून आले. या नवीन कुष्ठ रुग्णांत ग्रामीण भागातील १६८ तर शहरी भागातील २० रुग्णांचा समावेश आहे.
 
 
वर्धेत ७, हिंगणघाट ८, आर्वी ३, पुलगाव येथे २ तर वर्धा ग्रामीण मध्ये ३७, सेलू १८, देवळी २२, हिंगणघाट १७, समुद्रपूर २७, आर्वी १७, आष्टी १५ तर कारंजा ग्रामीण परिसरात १५ कुष्ठरोगी आढळून आले.
 
 
जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात १७ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर या काळात कुष्ठरुग्ण शोध मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान सुरुवातीला १२ हजार २६२ संशयित साडपले. त्यानंतर या संशयितांची तपासणी आरोग्य यंत्रणेतील तज्ज्ञांनी केल्यावर नवीन १८८ कुष्ठरुग्ण जिल्ह्यात सापडले आहे. या रुग्णांना उपचाराखाली आणण्यात आले असल्याची माहिती जिल्हा कुष्ठरोग अधिकारी डॉ. रा. ज. पराडकर यांनी दिली.
Powered By Sangraha 9.0