भाजपाची निवडणूक प्रचारात ‘आघाडी..!’

19 Dec 2025 19:50:03
तभा वृत्तसेवा
यवतमाळ, 
bjp-election-campaign : होऊ घातलेल्या यवतमाळ नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजपाकडून नगर परिषद अध्यक्ष पदाच्या उमेदवार अ‍ॅड. प्रियदर्शनी उईके यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. त्याचबरोबर भाजपाचे नगरसेवक पदाचे सर्व उमेदवार यांचासुद्धा जोरदार प्रचार सुरू आहे. नागरिकांचा या प्रचाराला प्रतिसाद मिळत असल्याने नगर परिषद निवडणुकीत भाजपाचा विजय जवळपास निश्चित असल्याचे राजकीय वर्तुळात बोलल्या जात आहे.
 
 

y19Dec-Prachar 
 
 
 
भारतीय जनता पार्टीच्या यवतमाळ नगर परिषद पदाच्या उमेदवार अ‍ॅड. प्रियदर्शनी अशोक उईके यांच्या प्रचाराकरिता ‘द ग्रेट’ खलीचा रोडशो करण्यात आला होता. या रोडशोमध्ये मोठ्या प्रमाणात शहरातील नागरिकांनी सहभाग नोंदविला.
 
 
त्याचबरोबर गुरुवार, 18 डिसेंबर रोजी प्रसिद्ध अभिनेत्री अमृता खानविलकर यांच्या नेतृत्वात अ‍ॅड. प्रियदर्शनी उईके यांच्यासाठी प्रचारार्थ रॅली काढण्यात आली. शहरातील विविध भागातून निघालेल्या या रॅलीत भाजपाचे कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते.
 
 
त्याचबरोबर भाजपाकडून संपूर्ण यवतमाळ शहरात कॉर्नर बैठका घेवून भाजपाला मतदान करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. त्यांनाही नागरिकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
Powered By Sangraha 9.0