पुणे,
Aadesh-Suchitra's amazing dance सोहम बांदेकर आणि पूजा बिरारीच्या लग्नात अभिनेता आदेश आणि अभिनेत्री सुचित्रा बांदेकर यांनी स्टेजवर धमाल केली. लोणावळ्यात पार पडलेल्या या समारंभात दोघांनी मिळून शानदार डान्स परफॉर्मन्स सादर केला. गडद हिरव्या रंगाचा शर्ट घालून आलेले आदेश आणि चंदेरी रंगाच्या ड्रेसमध्ये सुचित्रा स्टेजवर उतरल्यानंतर त्यांनी शाहरुख खानच्या ‘मेरे मेहबूब मेरे सनम’ गाण्यावर जबरदस्त डान्स केला.
त्यांच्या परफॉर्मन्समुळे उपस्थित सर्वांचा आनंद द्विगुणित झाला; टाळ्या आणि शिट्ट्यांनी परिसर दणाणून गेला. सोहम-पूजाच्या लग्नाच्या विधींना सुरूवात झाली असून, हळद, संगीत समारंभ आणि मेहंदीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.