अंबानगर जेष्ठ नागरिक मंडळात संविधान दिन साजरा

02 Dec 2025 18:35:17
नागपूर,
Ambanagar Dighori जेष्ठ नागरिक मंडळ, अंबानगर दिघोरी, नागपूर येथे विठ्ठल-रुख्मिणी मंदिरात संविधान दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी ऍडव्होकेट प्रफुल्ल वाघमारे, अध्यक्ष नामदेव भांडारकर व उपाध्यक्ष गजेंद्र सोनवणे उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात संविधान शपथ देऊन झाली. ऍडव्होकेट वाघमारे यांनी संविधानाचे महत्व, पुस्तकरूपाने प्रत्येक नागरिकाकडे ते असण्याची गरज तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सर्वसमावेशक विचारांचा उल्लेख केला. मंडळाचे सचिव सागर सोनवणे यांनी संविधानातील समृद्ध विचारांची माहिती प्रस्ताविकात मांडली.

ambna 
 
 
यावेळी नोव्हेंबर महिन्यात सेवानिवृत्त झालेल्या जेष्ठांचा सत्कार, तसेच वाढदिवसानिमित्त सत्कार समारंभ पार पडला. कार्यक्रमाचे संचालन नंदकिशोर उजवणे तर आभार प्रदर्शन दुर्वास पुरी यांनी केले. Ambanagar Dighori कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मिलिंद पांडे, इंदपालसिंग ठाकूर, विजय मेरखेड, दादाराव झनझाड, पांडुरंग अड्याळकर, पिल्लारे यांनी परिश्रम घेतले. 
सौजन्य : सतीश देशपांडे,संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0