चंद्रपूर जिल्ह्यात 3.30 वाजेपर्यंत सरासरी 39.87 टक्के मतदान

02 Dec 2025 16:45:22
चंद्रपूर,
voting rate in chandrapur चंद्रपूर जिल्ह्यातील 9 नगरपरिषद व 1 नगरपंचायतील एकूण 10 अध्यक्ष व 226 सदस्यांची निवड करण्याकरिता सुरू असलेल्या मतदानाची सकाळी 7.30 ते 3.30 वाजेपर्यंत एकूण सरासरी 39.87 टक्के एवढी आहे.
 
 
 
chandrapur jilha
 
अजूनही सर्वाधिक मतदान भिसी नगर पंचायतीत झाले असून, गडचांदूर नगर परिषदेत सर्वात कमी मतदान झाल्याची नोंद आहे.
voting rate in chandrapur नगर परिषद बल्लारपूर येथे 37.49 टक्के, भद्रावती 35.93, ब्रम्हपुरी 44.79, चिमूर 43.37, गडचांदूर 30.65, मूल 46.39, नागभीड 51.46, राजुरा 39.39, वरोडा नगर परिषदेत 34.53, तर भीसी नगर पंचायतीत 67.52 टक्के एवढे मतदान झाले आहे. दरम्यान, चिमुर येथील मतदान केंद्रावर चिमुर विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार मितेश भांगडिया, विधानसभा क्षेत्राचे आमदार किर्तिकुमार भांगडिया यांनी सहकुटुंब मतदान केले.
Powered By Sangraha 9.0