अनिल कांबळे
नागपूर,
thieves for fun दुचाकी चालविण्याचा शाैक पूर्ण करण्यासाठी दुचाकी चाेरणाèया तीन अल्पवयीन विधी संघर्षग्रस्त मुलांना पाचपावली पाेलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्या ताब्यातून चाेरीच्या पाच दुचाकी जप्त केल्या. 25 नाेव्हेंबर राेजी दुपारी 12.30 च्या सुमारास भगवंतसिंग नरंजनसिंग गिल (60) रा. बाबा बुढाजीनगर यांनी त्यांची ज्युपीटर दुचाकी घरासमाेर उभी केली हाेती. दरम्यान, अज्ञात चाेरांनी त्यांची दुचाकी चाेरून नेली हाेती. अर्ध्या तासानंतर गिल बाहेर आले असता त्यांना दुचाकी दिसून आली नाही. याप्रकरणी पाचपावली पाेलिसांनी चाेरीचा गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला हाेता.
पाचपावलीचे पाेलिस पथक गस्त घालत असताना लष्करीबाग येथील बाजीराव साखरे वाचनालयाजवळ एका दुचाकीवर तीन मुले संशयास्पद अवस्थेत जाताना दिसली. पाेलिसांनी त्यांना हटकले असता त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. पाेलिसांनी त्यांची विचारपूस केली असता ते उडवाउडवीची उत्तरे देत हाेते. त्यामुळे पाेलिसांचा संयश बळावला. त्यांच्याजवळ सापडलेल्या दुचाकीचा अभिलेख तपासला असता ती चाेरीची असल्याचे लक्षात आले.thieves for fun त्यानंतर मुलांनी बाबा बुढाजीनगर येथून दुचाकी चाेरल्याची कबुली दिली. याशिवाय पाचपावली आणि जरीपटका हद्दीतून अन्य चार दुचाकी चाेरल्याची कबुली दिली. पाेलिसांनी पाच दुचाकी जप्त केल्या.
मुले दहावीचे विद्यार्थी
पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तीनही मुले हे दहाव्या वर्गात शिकत आहेत. त्यांना दुचाकी चालविण्याचा शाैक हाेता. त्यामुळे त्यांनी दुचाकी चाेरण्याचा सपाटा लावला. जाेपर्यंत दुचाकीत पेट्राेल असे ताेपर्यंत ते दुचाकी चालवित हाेते. पेट्राेल संपले की, तेथेच बेवारस अवस्थेत दुचाकी टाकून ते दुसऱ्या वाहनाच्या शाेधात जायचे असेही पाेलिसांनी सांगितले. ही कारवाई ठाणेदार बाबुराव राऊत, उपनिरीक्षक रंजीत माजगांवकर, ज्ञानेश्वर भाेंगे, इम्रान शेख, राेमेश मेनेवार, संताेष शेंद्रे, महेंद्र सेलाेकर,प्रिती थाेरात यांनी केली.