श्रीनगरमध्ये दत्त जयंती महोत्सवाचे आयोजन

02 Dec 2025 14:23:58
नागपूर,
Datta Jayanti श्रीनगर जन्मोत्सव समितीतर्फे श्री दत्त मंदिर येथे वार्षिक श्री दत्त जयंती महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. मंदिर प्रांगणात श्री दत्त गुरु सप्ताह महोत्सव आयोजित केला असून, सप्ताहभर विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि अध्यात्मिक कार्यक्रम पार पडणार आहेत.
 
Datta Jayanti
 
उत्सवाची सुरुवात २७ नोव्हेंबरला श्रद्धेय शेखर जोशी यांच्या हस्ते श्री गुरुचरित्र पारायण पासून झाली. दररोज दुपारी व सायंकाळी विविध भजन मंडळांच्या कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. यामध्ये संत गजानन महाराज भजन मंडळ, राधाकृष्ण महिला भजन मंडळ, गुरुदेव सेवा मंडळ, सप्तरंग महिला भजन मंडळ, गायत्री महिला भजन मंडळ, रुक्मिणी महिला भजन मंडळ, वासवी महिला भजन मंडळ, गुरुकृपा महिला भजन मंडळ, गुरुदेव दत्त महिला भजन मंडळ, अभिरुची महिला भजन मंडळ अशा मंडळांचा समावेश आहे. Datta Jayanti २ डिसेंबर वासवी महिला भजन मंडळ तसेच गुरुकृपा महिला भजन मंडळ तर्फे भजन ३ डिसेंबर गुरुदेव दत्त महिला भजन मंडळ तसेच अभिरुची महिला भजन मंडळ तर्फे भजन व सुगम संगीताचे आयोजन करण्यात आले आहे.
 
मुख्य कार्यक्रम ४ डिसेंबर रोजी मुकुंद बुवा घारपुरे यांचे कीर्तन व संगीत नृत्य सादरीकरण स्मिता महाजन यांच्या हस्ते होणार आहे. तर ५ डिसेंबर रोजी गोपाल काला यांचे कीर्तन आयोजित असून, संध्याकाळी महाप्रसाद देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. उत्सवाच्या कालावधीत मंदिरात दररोज सकाळी ८:३० वाजता आणि सायंकाळी ७ वाजता आरती केली जाईल. Datta Jayanti श्रीनगर, सुयोग नगर, नरेंद्र नगर व परिसरातील भक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन समितीचे अध्यक्ष श्रीकांत बढे, सचिव शामवल दनवार आणि कोषाध्यक्ष कृष्णराव ठाकरे यांनी केले आहे.
सौजन्य: सुनील गव्हाणे, संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0