दिव्य नाडी परीक्षण कार्यशाळेत डॉ. पुसदकरांचा गौरव

02 Dec 2025 12:30:57
नागपूर,
Datta Meghe Ayurveda Medical College दत्ता मेघे आयुर्वेद मेडिकल कॉलेजमध्ये दिव्य नाडी परीक्षण या विशेष प्रात्यक्षिक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. सुप्रसिद्ध आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. संतोष सुर्यकांत पुसदकर यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कार्यशाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांनी अद्भुत आणि उत्सुकता वाढविणारा अनुभव घेतला. आयुर्वेद ग्रंथांमध्ये वर्णन केलेल्या दूत नाडी, नाथ नाडी आणि पञ्चभौतिक नाडी या तत्त्वांचे स्पष्टीकरण देत डॉ. पुसदकर यांनी प्रत्यक्ष नाडी परीक्षणाचे महत्त्व विद्यार्थ्यांसमोर उलगडले. नाडीचा स्पर्श घेऊन व्यक्तीची दोषप्रकृती, रोगस्थिती, मानसिक प्रवृत्ती तसेच दैनंदिन जीवनातील सूक्ष्म बाबींचा अंदाज कसा घेता येतो, याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांना दाखवण्यात आले.
 
Datta Meghe College
 
कार्यशाळेदरम्यान काही विद्यार्थ्यांच्या आहार, आवडी-निवडी आणि आजारस्थिती याबाबत डॉ. पुसदकरांनी केलेली अचूक निरीक्षणे पाहून विद्यार्थी अचंबित झाले. त्यामुळे या पारंपरिक निदानपद्धतीबद्दल त्यांची उत्सुकता अधिक तीव्र झाली. या प्रात्यक्षिकात एकूण १०० विद्यार्थी सहभागी झाले होते, त्यापैकी ५५ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष नाडी परीक्षणाचा अनुभव घेतला. विद्यार्थ्यांनी या तंत्रज्ञानाला अद्वितीय, प्रेरणादायी आणि नैदानिक शिक्षणासाठी अत्यंत उपयुक्त ठरल्याचे मत व्यक्त केले. Datta Meghe Ayurveda Medical College पुढे हे ज्ञान उपचारपद्धती, निदानशास्त्र आणि औषधनिर्मितीमध्ये कसे वापरता येईल, याबाबतही सखोल मार्गदर्शन देण्यात आले. कार्यक्रमादरम्यान डॉ. संतोष पुसदकर यांचा सत्कार कॉलेजच्या प्राचार्या डॉ. हर्षला राजूरकर यांच्या हस्ते करण्यात आला. उपस्थितांनी त्यांच्या कार्याचा व आयुर्वेदातील संशोधनपर योगदानाचा विशेष गौरव केला.
सौजन्य: निकिता लुटे, संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0