दुशान्बे,
earthquake hits Tajikistan ताजिकिस्तान मंगळवारी पुन्हा भूकंपाच्या धक्क्याने हादरले आहे. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्र (NCS) नुसार, या भूकंपाची तीव्रता ३.९ होती आणि तो सुमारे ७५ किलोमीटर खोलीवर नोंदवला गेला. ताजिकिस्तान हा मोठ्या प्रमाणात पर्वतीय भाग असलेल्या देशामुळे नैसर्गिक आपत्तींना वारंवार बळी पडतो. या भागात भूकंपासोबत पूर, दुष्काळ, हिमस्खलन, भूस्खलन यासारख्या आपत्तींना सतत सामोरे जावे लागते.
जागतिक बँकेच्या अहवालानुसार, हवामान बदलामुळे ताजिकिस्तानची असुरक्षितता आणखी वाढली आहे, कारण २०५० पर्यंत देशातील ३०% हिमनदी वितळण्याची शक्यता आहे. हिमनदीवर अवलंबून असलेल्या नदीच्या खोऱ्या, जलविद्युत, सिंचन प्रणाली आणि पर्वतीय परिसंस्था या सर्वांवर भविष्यात धोका निर्माण होऊ शकतो.