चंद्रपूर जिल्ह्यात 11.30 वाजेपर्यंत 14.02 टक्के मतदान

* सर्वाधिक मतदान भिसीनगर पंचायतीत * तर सर्वात कमी गडचांदूर नगर परिषदेत

    दिनांक :02-Dec-2025
Total Views |
चंद्रपूर, 
voting-in-chandrapur-district चंद्रपूर जिल्ह्यातील 9 नगरपरिषद व 1 नगरपंचायतीच्या एकूण 10 अध्यक्ष व 226 सदस्यपदाच्या निवडणुकीसाठी मतदार सुरू असून, सकाळी 7.30 ते 11.30 वाजेदरम्यान मतदानाची एकूण सरासरी 14.02 टक्के एवढी आहे. आतापर्यंत सर्वाधिक 22.59 टक्के मतदान भिसी नगर पंचायतीत झाले. तर गडचांदूर नगर परिषदेत सर्वात कमी म्हणजे, केवळ 8.61 टक्केच मतदान झाले आहे.
 
 
voting-in-chandrapur-district
 
नगर परिषद बल्लारपूर येथे 14.29 टक्के, भद्रावती 12.55, ब्रम्हपुरी 15.41, चिमूर 14.20, गडचांदूर 8.61, मूल 18.16, नागभीड 18.47, राजुरा 12.70, वरोडा नगर परिषदेत 11.98, तर भीसी नगर पंचायतीत 22.59 टक्के एवढे मतदान झाले आहे. voting-in-chandrapur-district सकाळी 11.30 वाजेपर्यंत पूर्ण जिल्ह्यात सरासरी 14.02 टक्के मतदान झाले आहे. ब्रम्हपुरी नगरपरिषद निवडणुकीत राज्याचे विरोधी पक्ष नेता तथा आमदार विजय वडेट्टीवार यांनी पत्नी किरण, मुलगी रोशनी, शिवानी आणि देवयानी यांच्यासोबत मतदानाचा हक्क बजावला.