रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीत स्वीय सहायक प्रशिक्षण पूर्ण

02 Dec 2025 16:49:11
 नागपूर,
Personal assistant in training रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी, भाईंदर (ठाणे) येथे २२ ते २६ नोव्हेंबर दरम्यान स्वीय सहायक प्रशिक्षण प्रमाणपत्र अभ्यासक्रम पार पडला. राज्यभरातील ७५ युवकांनी सहभाग घेतलेल्या या प्रशिक्षणात नागपूर जिल्यातून रुपल दोडके यांनी पाचव्या बेंचमध्ये प्रशिक्षण पूर्ण केले. त्यांना ठाण्याचे आमदार संजय केळकर आणि विनय मावळकर यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले.
 
rupal
 
प्रशिक्षणात स्वीय सहायकाची भूमिका, विधिमंडळ कामकाज, कायदे-नियम, सोशल मीडिया, प्रसारमाध्यमे संपर्क, संवाद कौशल्ये, ताण-तणाव व्यवस्थापन, वेळ नियोजन, शासन-प्रशासन समन्वय, कार्यालयीन व्यवस्थापन आणि मतदारसंघ अभ्यास यांसारख्या विषयांवर तज्ज्ञ मार्गदर्शन देण्यात आले. Personal assistant in training विशेष मार्गदर्शनासाठी मनोज कोटक, अजित चव्हाण, डॉ. अनंत कळसे, सचिन सानप, नीलेश मदाने, डॉ. चेतन नेरकर यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0