अक्षदा पडण्यापूर्वी नवरदेवाने बोटाला लावली शाई

02 Dec 2025 20:27:02
पुलगाव,
pulgaon-municipal-council-election : नगरपरिषद निवडणुकीचा मुहूर्त व लग्नाचा मुहूर्त हा सोबतच असल्यामुळे अनेक ठिकाणी मतदानावर परिणाम होण्याची शयता निर्माण झाली आहे. परंतु, अशातही मतदानाला महत्त्व देत नवरदेवच सर्व वर्‍हाड्यांसह मतदानाला पोहोचण्याची घटना पुलगाव येथे मतदान केंद्र क्रमांक ७४ जुना पुलगाव येथे घडली.
 
 
 
pul
 
 
 
आधी लग्न कोंढाण्याचे... हा छत्रपती शिवाजी महाराजांचा बाणा अंगी बांधून नवरदेव अक्षय बहादुरकर याने विवाहाला निघण्यापूर्वी मतदानाचा हक बजावला. त्याचप्रमाणे त्याच्यासोबत लग्नाला येणारे वर्‍हाडी यांनासुद्धा आधी मतदान, मग लग्न असे सांगून सकाळीच मतदानाचा हक गाजवण्यास सांगितले. अक्षयच्या या मतदानाला महत्त्व देण्याच्या निर्णयामुळे लोकशाहीला महत्त्व प्राप्त झाले आहे. बहादुरकर परिवाराने घेतलेल्या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
Powered By Sangraha 9.0