...म्हणून रणवीर सिंगने पाहिली सार्वजनिक माफी

    दिनांक :02-Dec-2025
Total Views |
मुंबई,
ranbir and kantara crisis अभिनेता रणवीर सिंग ‘धुरंधर’ चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान केलेल्या एका टिप्पणीमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. ‘कांतारा: चॅप्टर १’ या चित्रपटातील एका दृश्याचा उल्लेख करताना रणवीरने देवीला ‘स्त्री भूत’ असा उल्लेख केला होता. त्यानंतर सोशल मीडियावरून त्याच्यावर धार्मिक भावना दुखावल्याचे आरोप झाले. गोव्यातील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (IFFI) रणवीरने ऋषभ शेट्टीच्या अभिनयाचं कौतुक करत त्याची नक्कल केली. मात्र या दरम्यान देवीचा चुकीचा उल्लेख त्याच्याकडून झाला. यामुळे प्रेक्षक आणि सोशल मीडियावर संताप व्यक्त झाला.
 

ranvir and kantara 
वाद चिघळल्यानंतर रणवीरने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत याबाबत स्पष्टीकरण दिलं. माझा हेतू फक्त ऋषभ शेट्टीच्या उत्कृष्ट अभिनयाचं कौतुक करण्याचा होता. त्या सीनची कठीणता मला माहित आहे आणि त्याच्याबद्दल प्रचंड आदर आहे. मी कधीही कोणत्याही संस्कृतीचा किंवा श्रद्धेचा अनादर करण्याचा उद्देश बाळगला नाही. जर माझ्या वक्तव्यामुळे कोणाचं मन दुखावलं असेल तर मी मनापासून माफी मागतो,”असे रणवीरने लिहिले. या निवेदनानंतर रणवीरचा माफी मागण्याचा निर्णय सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.