हैद्राबाद,
Samantha's second marriage अभिनेत्री समंथा रुथ प्रभू तिच्या खासगी आयुष्यामुळे सतत चर्चेत असते. 1 डिसेंबर रोजी तिने दिग्दर्शक राज निदिमोरूशी दुसरे लग्न केले. कोइंबतूरमधल्या ईशा फाऊंडेशनच्या लिंग भैरवी मंदिरात ‘भूत शुद्धी विवाहपद्धती’नुसार पार पडलेल्या या समारंभाचे फोटो समंथाने सोशल मीडियावर शेअर केले, ज्यामुळे चाहत्यांना आश्चर्य आणि आनंद दोन्हीचाच धक्का बसला.
समंथाच्या दुसऱ्या लग्नाच्या फोटोंची चर्चा सुरु असतानाच, तिचा पूर्व पती नाग चैतन्यने त्याच दिवशी स्वतःचा एक फोटो पोस्ट केला. हा फोटो पाहून नेटकरी त्याला खूप ट्रोल करत आहेत. काही युजर्सने ‘समंथासारखा हिरा तू गमावलास’ असेही कमेंट केले आहेत. समंथा आणि नाग चैतन्यने 2017 मध्ये लग्न केले होते, पण चार वर्षांनंतर, 2021 मध्ये ते विभक्त झाले. घटस्फोटानंतर नाग चैतन्यने अभिनेत्री सोभिता धुलिपालाशी दुसरे लग्न केले. आता समंथानेही राजशी दुसरे लग्न करून आयुष्याच्या नव्या प्रवासाची सुरुवात केली आहे. जरी दोघे आपापल्या आयुष्यात पुढे गेले असले, तरी समंथा–नाग चैतन्यच्या जोडीचे चाहते आजही अनेक आहेत, ज्यांनी नागच्या पोस्टवर प्रतिक्रिया दिल्या आहेत.