मोठी बातमी...वर्धेत सरासरी ६१.०६ टके मतदान

02 Dec 2025 20:43:23
वर्धा,
 
wardha-election-voting जिल्ह्यात आज मंगळवारी लग्नाचा मोठ्या प्रमाणात ठोक असल्याने मतदानाची टक्केवारी घसरेल, असा अंदाज वर्तविण्यात येत होता. मात्र, दरवेळी प्रमाणे यावेळीही वर्धा जिल्ह्यात पाच नगरपालिकांमध्ये मतदानाच्या टक्केवारीचा आकडा गाठता आला. जिल्ह्यात सरासरी ६१.०६ टके मतदान झाल्याचे प्राथमिक माहिती मिळाली. wardha-election-voting यात आर्वी येथे ६१.०० टके. सिंदी रेल्वे येथे ७१.०० टके. पुलगाव ६०.००. वर्धा ५७.२९ तर हिंगणघाट ५९.०० टके मतदान झाल्याचे सांगण्यात आले. हिंगणघाट येथे दोन मतदान केंद्रांवर रात्री साडेसात वाजेपर्यंत मतदारांच्या रांगा होत्या.
 

wardha-election-voting 
(संग्रहित छायाचित्र) 
Powered By Sangraha 9.0