संविधान दिनानिमित्त योग व प्रज्ञा कार्यक्रम

02 Dec 2025 14:18:54
नागपूर,
Constitution Day संविधान दिनानिमित्त पतंजली योग व प्राणायमंडळ, पंडित दीनदयाल उपाध्याय गार्डन, रघुजी नगर येथे ज्येष्ठ योगगुरु ऍड. नामदेव फटींग यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
 
Constitution Day
 
कार्यक्रमात हरीश देशमुख यांनी अंधश्रद्धा निर्मूलनाच्या उपक्रमांतर्गत संविधानातील कलम ५१ चा वैधानिक दृष्टिकोन अंगीकारण्याचे आवाहन केले. भीमराव पाटील यांनी संविधान कोणत्या तत्त्वांनी बनले आहे, त्यामुळे देशाची एकात्मता कशी साधली गेली, संविधानाने महिलांना काय हक्क दिले, तसेच शोषित व वंचित घटकांना काय अधिकार प्रदान केले आहेत, याबाबत सविस्तर माहिती दिली. Constitution Day अध्यक्षीय भाषणानंतर फटींग यांनी संविधानाच्या उद्धेशिकेचे वाचन केले. कार्यक्रमाच्या शेवटी महादेव बोराडे यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाला गुलाब उमाठे, मोरेश्वर मेंगरे, श्रीराम दुरुगकर, पद्माकर बाविस्कर तसेच सर्व साधक उपस्थित होते.
सौजन्य: श्रीराम दुरुगकर, संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0