नवी दिल्ली,
A twist in the T20 World Cup squad टी-20 विश्वचषक 2026 साठी आज भारतीय संघाची घोषणा होणार असून, संघात काही मोठे ट्विस्ट दिसून येत आहेत. 7 फेब्रुवारी 2025 पासून सुरू होणाऱ्या आणि 8 मार्च 2026 पर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेचे आयोजन भारत आणि श्रीलंकेकडून केले जाणार आहे. 30 दिवसांत 55 सामने खेळवण्यात येणार असून 20 संघांची सहभागिता निश्चित करण्यात आली आहे. आज दुपारी 1.30 वाजता BCCI प्रमुख अजित आगरकर पत्रकार परिषद घेऊन टीम इंडियाची अधिकृत घोषणा करतील.
टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादव सध्या खराब फॉर्ममध्ये असला तरी तो कर्णधारपदी कायम राहणार आहे. उपकर्णधार शुभमन गिलच्या खराब कामगिरीमुळे संघात त्याला स्थान मिळण्याची शक्यता कमी आहे. मात्र ईशान किशनने सय्यद मुस्ताक अली ट्रॉफीत केलेल्या उत्कृष्ट कामगिरीमुळे सर्वांचे लक्ष वेधले आहे. किशनने 197 च्या स्ट्राईक रेटने 33 षटकारांसह 517 धावा ठोकल्या आणि झारखंड संघाला पहिल्यांदाच ट्रॉफी जिंकवली. या कामगिरीमुळे त्याला संघात स्थान मिळण्याची शक्यता वाढली आहे.
टीममध्ये ऋषभ पंत आणि रिंकू सिंग यांना स्थान मिळण्याची शक्यता कमी आहे, कारण यष्टिरक्षक-फलंदाज म्हणून संजू सॅमसन आणि जितेश शर्मा आधीच उपलब्ध आहेत. हार्दिक पंड्या, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग आणि तिलक वर्मा यांनाही संघात स्थान मिळेल. यशस्वी जयस्वाल आणि रिंकू सिंग राखीव खेळाडू म्हणून असतील.
टी-20 विश्वचषकासाठी भारताचा संभाव्य संघ: सूर्यकुमार यादव (कर्णधार), ईशान किशन, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या (उपकर्णधार), शिवम दुबे, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, हर्षित राणा, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल.