उमरखेड न. प. निवडणुकीची मतमोजणी उद्या

20 Dec 2025 21:22:26
तभा वृत्तसेवा
उमरखेड, 
municipal-council-elections : 2 डिसेंबर रोजी पार पडलेल्या उमरखेड नगरपरिषद निवडणुकीचा निकाल निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे लांबणीवर पडला होता. अखेर रविवार, 21 डिसेंबर रोजी नगरपरिषद मंगल कार्यालयात मतमोजणी होत असून 13 प्रभागांतील 127 नगरसेवक पदाचे उमेदवार व नगर परिषद अध्यक्षपदाच्या 5 उमेदवारांचे भवितव्य स्पष्ट होणार आहे.
 

y20Dec-Umarkhed-N-P 
 
मतमोजणीसाठी प्रशासनाने संपूर्ण तयारी केली असून 120 अधिकारी व कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. सकाळी 10 वाजता मतमोजणी सुरू होणार आहे. नगरपरिषदेच्या मंगल कार्यालयातील हॉलमध्ये ही प्रक्रिया पार पडणार आहे. मतमोजणीसाठी एकूण 7 टेबल लावण्यात आले असून, 8 फेèयांत संपूर्ण निकाल जाहीर होणार आहे.
 
 
प्रभाग क्रमांक 1, 2, 3, 4, 5 व 7 यांची मतमोजणी 3 फेèयांत, तर प्रभाग क्रमांक 6 ची मतमोजणी 4 फेèयांत होणार आहे. पहिल्या चार फेèयांत सात प्रभागांतील उमेदवारांचे निकाल स्पष्ट झाल्यानंतर, पाचव्या ते आठव्या फेरीदरम्यान प्रभाग क्रमांक 8, 9 व 12 यांची मतमोजणी तीन फेèयांत होईल. उर्वरित प्रभाग क्रमांक 10, 11 व 13 यांची मतमोजणी चार फेèयांत होणार आहे. सर्व आठ फेèया पूर्ण झाल्यानंतर नगराध्यक्षपदाचा निकाल जाहीर होणार आहे.
 
 
प्रत्येक टेबलवर प्री-गणना पथकातील 3 ते 4 कर्मचारी कार्यरत असून, त्यांच्याकडील माहिती स्वतंत्र पथकाद्वारे संगणक व ऑनलाइन चमूपर्यंत पोहोचवली जाईल. आकडे तपासून अंतिम स्वरूपात निवडणूक निर्णय अधिकाèयांकडे सादर केल्यानंतर अधिकृत निकालाची घोषणा होईल.
 
 
मतमोजणी सुरू होण्याच्या शेवटच्या क्षणी निवडणूक रिंगणात असलेल्या प्रत्येक उमेदवाराची धाकधूक वाढली आहे. विकासाच्या नावावर कमळ उमलणार, बस धावणार, तुतारी वाजणार, पतंग उडणार, बाण चालणार की नवे समीकरण उभे राहणार, याकडे संपूर्ण उमरखेड शहराचे लक्ष लागले आहे. बहुरंगी लढतीनंतर दुरंगी लढतीत कमळ आणि बसमध्ये निकाल लागणार की, राजकीय धक्कातंत्र उभे राहणार, याचे उत्तर मतपेटीतून बाहेर येणार आहे.
वाहतूक बंदोबस्त व कडेकोट पोलिस सुरक्षा
 
 
मतमोजणीच्या पृष्ठभूमीवर पोलिस प्रशासनाने कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. 12 पोलिस अधिकारी, 85 पोलिस कर्मचारी, 1 आरसीपी पथक, 1 बीएसआरपीएफ पथक व 30 गृहरक्षक तैनात करण्यात आले आहेत.
 
 
मतमोजणीच्या ठिकाणाजवळील वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. पोलिस ठाणे ते शिवाजी चौक दरम्यान वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे. शहरातील प्रमुख मार्गांवरही वाहतूक नियंत्रण ठेवण्यात आली आहे, अशी माहिती पोलिस प्रशासनाने दिली.
Powered By Sangraha 9.0