आजनसरा,
nitin-gadkari : हिंगणघाट तालुक्यातील दारोडा या गावाजवळून नागपूर हैद्राबाद हा राष्ट्रीय महामार्ग जात असून गावालगत वाहतूक कोंडी टाळता यावी, स्थानिक वाहने व गावकर्यांना थेट जाण्यासाठी सोईस्कर मार्ग उपलब्ध व्हावा यासाठी सर्व्हिस रोड तयार करण्यात यावा या मागणीचे निवेदन पंसचे माजी सदस्य डॉ. विजय पर्बत यांच्या नेतृत्वात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना दिले.
ना. गडकरी यांना दिलेल्या निवेदनानुसार, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरनकडून महामार्गाखाली बोगदा करण्यात आला आहे. परंतु, सर्व्हिस रोड नसल्याने दारोडावासियांना जिव मुठीत घेऊन रस्ता ओलांडावा लागतो. त्यामुळे या स्थळी बोगदा असून सुद्धा केवळ सर्व्हिस रोड करण्यात आला नसल्याने अनेक मोठे अपघात होऊन गावाकर्यांना आपला जिव गमवावा लागला. त्यामुळे पंसचे माजी सदस्य डॉ. विजय पर्बत, माता मंदिर देवस्थानचे विश्वस्त गणपत गाडेकर, सामाजिक कार्यकर्ते संजय कोसूरकर यांनी केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांची भेट घेऊन सर्व्हिस रोड तयार करण्याची मागणी केली.