गडचिरोलीतील 3 तर आरमोरीतील एका प्रभागाची निवडणूक शांततेत

20 Dec 2025 17:23:38
गडचिरोली,
Gadchiroli municipal election, अर्ज वैध ठरविण्यावरून आलेल्या आक्षेपांमुळे गडचिरोलीतील 3 आणि आरमोरीतील एक 4 जागांची निवडणूक प्रक्रिया थांबवली होती. त्या जागांसाठी आज शनिवारी घेण्यात आलेली मतदान प्रक्रीया शांततेत पार पडली. या चार जागांसाठी एकूण 19 उमेदवार निवडणूक रिंगणात होते. त्यांचेही भाग्य आज मशीनबंद झाले.
 

Gadchiroli municipal election, 
गडचिरोली नगर परीषदेतील प्रभाग क्र.1 अ, प्रभाग 4 ब आणि प्रभाग 11 ब तर आरमोरीत प्रभाग 10 अ मधील नगरसेवकपदासाठी आज शनिवारी मतदान प्रक्रिया घेण्यात आली. त्या प्रभागातील मतदार नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांसाठीही मतदान केले. गडचिरोलीत प्रभाग 1 अ मधून काँग्रेसचे माजी नगरसेवक रमेश चौधरी, प्रभाग 11 ब मधून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष लीलाधर भरडकर आणि भारतीय जनता युवा मोर्चाचे माजी जिल्हाध्यक्ष अनिल तिडके तसेच प्रभाग 4 ब मध्ये भाजपचे संजय मांडवगडे, शिवसेना (शिंदे गट) हेमंत जंबेवार अशा प्रमुख उमेदवार रिंगणात आहेत.
Powered By Sangraha 9.0