घरासमोर खेळणाऱ्या मुलीला स्कूटरने हवेत उडविले...video

20 Dec 2025 10:09:35
हापूर,
girl into air by the scooter उत्तर प्रदेशातील हापूर शहरात बेदरकार वाहनचालकामुळे थरारक अपघात घडल्याची घटना समोर आली आहे. भरधाव वेगाने येणाऱ्या स्कूटरने घराबाहेर खेळत असलेल्या एका चिमुकल्या मुलीला जोरदार धडक दिली. धडक इतकी तीव्र होती की मुलगी काही फूट हवेत उडाली आणि थेट रस्त्यावर कोसळली. या अपघातात तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या संपूर्ण घटनेचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
 
girl into air by the scooter hapur
 
ही घटना शुक्रवारी सायंकाळी हापूर नगर कोतवाली हद्दीतील रेल्वे रोडवरील पंजाबी कॉलनी परिसरात घडली. चार वर्षांची मुलगी आपल्या घरासमोर खेळत असताना रस्त्यावरून सामान्य वेगाने वाहने ये-जा करत होती. त्याच वेळी एका स्कूटरस्वाराने प्रचंड वेगात येत मुलीला धडक दिली. अपघातानंतर आसपासच्या नागरिकांनी धाव घेत मुलीला उचलून उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.
 
 
 
या घटनेनंतर मुलीची आई सलोनी खरबंदा यांनी आरोपी स्कूटर चालकाविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून कठोर कारवाईची मागणी केली आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला असून फरार चालकाचा शोध घेण्यात येत आहे.
Powered By Sangraha 9.0