चंद्रपूर,
human organ trafficking अवैध सावकारी कर्जातून नागभीड तालुक्यातील रोशन कुळे या शेतकर्याला आठ लाखात त्याची किडनी विकावी लागली. हे धक्कादायक प्रकरण उघडकीस येताच, त्याचे अन्य कांगोरेही पुढे येऊ लागले आहेत. किडनी विक्री प्रकरणी आंतराष्ट्रीय संबंधाचे धागेदोरे गवसले असले, तरी सारी सूत्रे जोवर जुळत नाही तोवर कुठल्याच निष्कर्षावर पोहोचता येत नाही. कुणाच्या खात्यातून कुणाच्या खात्यात किती पैसे आले यावरून प्रकरणाची सत्यता तपासणे सुरू आहे. त्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) गठित करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी दिली.
या ‘एसआयटी’त अतिरिक्त पोलिस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या नेतृत्वाखाली ब्रम्हपुरीचे उपविभागीय पोलिस अधिकारी सत्यजीत आमले, स्थानिक गुन्हे शाखा पोलिस निरीक्षक अमोल कचोरे व दोन पोलिस अधिकारी, सायबर पोलिस निरीक्षक सुनील गाडे, ब्रम्हपुरीचे पोलिस निरीक्षक प्रमोद बानबले आदींचा समावेश आहे.कोलकत्ता येथील डॉ. कृष्णाच्या माध्यमातून कंबोडिया येथे जाऊन किडनी विकल्याचे रोशन कुळे सांगत आहे. शिवाय तेथे त्याने एका कॉल सेंटरमध्ये कामही केल्याचे तो सांगतो. मात्र, या सार्या गोष्टींचा तपास आणि त्याची सुसूत्रता जोवर स्पष्ट होत नाही, तोवर त्याविषयी भाष्य करता येत नाही, असेही मुमक्का यांनी सांगितले. याबाबत तपास सुरू असून, वैद्यकीय कागदपत्रे आणि संपर्क साखळीची पडताळणी केली जात आहे, एवढेच सध्या सांगता येईल असेही त्यांनी स्पष्ट केले.
पीडित शेतकरी human organ trafficking रोशन कुळे यांनी किती रक्कम कुठून घेतली, किती परतफेड केली, कोणत्या स्वरूपात पैसे दिले याचा संपूर्ण आर्थिक हिशेब तपासला जात आहे. तपासातून जे निष्पन्न होईल, त्यानुसार पुढील कार्यवाही केली जाईल. रोशन कुळे यांनी, समाजमाध्यमातून डॉ. क्रिष्णाच्या संपर्कात आलो आणि कोलकता येथे जाऊन विविध तपासण्या पूर्ण केल्या. त्यानंतर कंबोडिया येथे जाऊन किडनी काढली आणि ती विकली. माझ्यासोबत अन्य लोकही होते अशी माहिती पोलिसांना दिली आहे. या सर्वघटनाक्रमांची चौकशी होत आहे.
दरम्यान, ब्रह्मपुरी तालुक्यात अवैध सावकाराकडून त्रस्त झालेला आणखी एक पीडितने पुढे आला असून, ब्रह्मपुरी पोलिस ठाण्यात त्याने तक्रार दाखल केली आहे. राजकुमार दादाजी बावणे (32, व्यवसाय मजुरी, रा. सोनेगाव) असे फिर्यादीचे नाव आहे. राजकुमार यांनी, आरोपी लक्ष्मण पुंडलिक उरकुडे (रा. ब्रह्मपुरी) याच्याविरोधात अवैध सावकारी, धमकी तसेच आर्थिक व मानसिक छळ केल्याचा गंभीर आरोप केला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाच आरोपींच्या पोलिस कोठडीत सोमवारपर्यंत वाढ
रोशन कुळे तक्रार human organ trafficking प्रकरणी आरोपी मनिष पुरुषोत्तम घाटबांधे अद्याप फरारच असून, उर्वरित आरोपी किशोर रामभाऊ बावणकुळे, लक्ष्मण पुंडलिक उरकुडे, प्रदीप रामभाऊ बावणकुळे, संजय विठोबा बल्लारपुरे आणि सत्यवान रामरतन बोरकर यांची पोलिस कोठडी शनिवारी संपताच, न्यायालयाने त्यांची पोलिस कोठडी सोमवार, 22 डिसेंबरपर्यंत वाढवली आहे.
==============