इतवारी–मोतीबाग ब्रॉडगेज प्रकल्पासाठी अतिक्रमण हटविण्याची कारवाई

20 Dec 2025 17:14:05
नागपूर,
Itwari Station नेताजी सुभाषचंद्र बोस इतवारी स्टेशन ते मोतीबाग दरम्यान प्रस्तावित ब्रॉडगेज रेल्वे मार्गाच्या कामासाठी रेल्वे प्रशासनाने शनिवारी सकाळी अतिक्रमण हटविण्याची कारवाई केली. सुमारे 3.5 किलोमीटर लांबीच्या या प्रकल्पा अंतर्गत विद्यमान नॅरोगेज मार्गालगत असलेल्या दक्षिण पूर्व मध्य रेल्वे (SECR) च्या जमिनीवरील एकूण 145 बेकायदेशीर अतिक्रमणे हटविण्यात आली.
 
 

gole 
 
रेल्वे प्रशासनाने यापूर्वी लोक परिसर (अनधिकृत अधिभोग) अधिनियम, 1971 अंतर्गत अतिक्रमण धारकांना नोटिसा बजावल्या होत्या. संपदा अधिकाऱ्यांच्या आदेशानंतरही जमीन रिकामी न केल्याने शनिवारी सकाळी ही कारवाई करण्यात आली.सकाळी सुरू झालेली कारवाई दुपारी 3 वाजेपर्यंत चालली.Itwari Station या दरम्यान रेल्वे सुरक्षा बलासह स्थानिक पोलीस दलाचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. प्रारंभी काही नागरिकांनी विरोध दर्शविला; मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे संपूर्ण कारवाई शांततेत पार पडली.कारवाई दरम्यान अनेक रहिवासी घरगुती साहित्य हातगाड्या व ठेल्यांवर हलविताना दिसून आले. बाधित नागरिकांनी प्रशासनाकडे पर्यायी पुनर्वसन किंवा तात्पुरत्या निवाऱ्याची मागणी केली. संपूर्ण मोहिमेदरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यात आली.या कारवाईसाठी रेल्वे प्रशासनाकडून राजकिशोर, एसएसई (पी.वे.)/केपी (प्रभारी) यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यांच्या समन्वयातून कारवाई यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आली.
सौजन्य :डॉ. प्रवीण डबली,संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0