नागपूर,
jungle-tourism : नाताळच्या सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी नागपूरकरांनी यंदा जंगल सफारीचा पर्याय निवडला आहे. यात प्रामुख्याने पेंच, करंडला आणि ताडोबा सफारीकरिता अनेेकांनी बुकींग केल्या असल्याने २५ डिसेंबर ते ३१ जानेवारी पर्यंतच्या सफारींची तिकिटे आधीच बुक झाली असल्याची माहिती ताडोबा व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक डॉ. शुक्ला यांनी दिली आहे.
नवीन वर्षांचे स्वागत जंगलात
मुख्यत: नाताळ निमित्त सुट्ट्या असल्याने निसर्गाच्या सान्निध्यात जंगल पर्यटनासाठी अनेकांनी पेंच, करंडला आणि ताडोबा सफारीला प्राधान्य दिल्याचे दिसून येते. नाताळ व त्यानंतर नवीन वर्ष साजरे करण्यासाठी पर्यटकांनी संपूर्ण नियोजन केले आहे. यामुळेच अनेक पर्यटनस्थळांवरील कॉटेज बुकिंग हाऊसफुल झाले आहे. गत काही जंगलात नवीन वर्ष साजरे करणार्यांची संख्या वाढल्याने विदर्भातील बहुतेक जंगल सफारीच्या स्थळांवर मोठी गर्दी असते.
उमरेड, करंडला भेटी देणारे पर्यटक वाढले
नवीन वर्षाच्या स्वागतासाठी विदेशात जाणारे आता विदर्भातील पर्यटनस्थळांकडे वळले आहे. नागपूर जिल्ह्यातील सर्वात मोठा वन सफारी पेंच व्याघ्र प्रकल्प असून बुकींग फूल असल्याने पर्यटकांना ऑफलाइनचा पर्याय आहे. पेंच प्रकल्प परिसरातील जंगलात सात दरवाजे आहेत. पूर्व पेंचमधील सिल्लारी, खुरसापर आणि चोरबाहुली आणि पश्चिम पेंचमधील कोलितमारा, सुरेवानी आणि खुबाडा आदी मार्गे दररोज हजारोंच्या संख्येने पर्यटक येतात. पेंच व्याघ्र प्रकल्पातील जंगलात ५० हून अधिक वाघ दिसून येतात. बिबट्यांची संख्या सुध्दा मोठी असल्याने जंगल पर्यटनासाठी अनेकजण उमरेड आणि करंडला भेटी देणारे वाढले आहे.
जंगल सफारीचा आनंद
ताडोबा व्याघ्र प्रकल्पासाठी अनेकांनी दिवाळी दरम्यानच्या काळातच बुकींग केल्याने जंगल सफारीचा आनंद लुटता येणार आहे. गत अडीच महिन्यांपासून ऑनलाइन बुकींग पूर्ण झाल्याचे दाखवल्या जात आहेत. आता, नवीन वर्षातही, या उपलब्ध होतात किंवा नाहीत, असा प्रश्न पर्यटकांनी केला आहे.