hydrated water उन्हाळा असो वा हिवाळा, शरीर हायड्रेट ठेवणे अत्यंत आवश्यक असते. पण फक्त जास्त पाणी प्यायल्यामुळे अनेकांना सतत लघवी होण्याची समस्या भासते. यावर आहारतज्ञानचे म्हणणे “साधे पाणी शरीरातून पटकन बाहेर निघून जाते, त्यामुळे फक्त पाणी प्यायल्यास शरीराच्या पेशींना पुरेसा हायड्रेशन मिळत नाही. पाण्यात पुदिन्याची पाने, लिंबू किंवा मीठ मिसळल्यास ते शरीराच्या पेशींमध्ये अधिक काळ टिकते. अशा प्रकारे शरीर खऱ्या अर्थाने हायड्रेट राहते आणि सतत लघवीसुद्धा होत नाही. यामुळे दिवसभर थोडे-थोडे पाणी पिणे किंवा डिटॉक्स वॉटरचे सेवन फायदेशीर ठरते.”
२-३ लिटर पाणी प्यायल्याने शरीर हायड्रेटेड राहते असे समजणे चुकीचे आहे. हायड्रेशनची पातळी पाण्यात मिसळलेल्या घटकांवर अवलंबून असते. पुदिन्याची पाने, लिंबाचे तुकडे, काकडी, तुळशीची पाने यांसारखी पॉवर-पॅक्ड डिटॉक्स वॉटर हळूहळू शरीरात पोषक तत्वे सोडतात, ज्यामुळे हायड्रेशन टिकते आणि पचन सुधारते.
त्याचबरोबर नारळ पाणी, बार्लीचे पाणी आणि हर्बल टी देखील मूत्राशयावर सौम्य प्रभाव टाकतात आणि हायड्रेटेड ठेवतात. परंतु कॅफिन किंवा कार्बोनेटेड पेये टाळण्याचा सल्ला डॉक्टर पटेल यांनी दिला आहे, कारण ते मूत्राशयाला जळजळ देऊ शकतात.
अनेकांना २-३ लिटर पाणी लगेच प्यायल्यावर लगेचच लघवीस जाण्याची समस्या भासत असते. हे मुख्यतः जेव्हा पाणी एका वेळी जास्त प्रमाणात घेतले जाते किंवा मूत्राशय संवेदनशील असतो तेव्हा होते.hydrated water त्यामुळे दिवसभर थोडे-थोडे पाणी प्यायल्यास सतत बाथरूमला जाण्याची समस्या टाळता येते. जर सतत लघवी होणे तुमच्या दैनंदिन जीवनावर परिणाम करत असेल, तर मूत्रमार्गाचा संसर्ग, ओव्हरॲक्टिव्ह ब्लॅडर किंवा मधुमेह यांसारखे आजार उद्भवू नयेत म्हणून तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.