धुक्यामुळे लँडिंग न झाल्याने मोदींचे हेलिकॉप्टर कोलकाताला परतले!

20 Dec 2025 14:20:30
नवी दिल्ली
Modi's helicopter returned to Kolkata पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पश्चिम बंगालमधील नादिया जिल्ह्याचा दौरा धुक्यामुळे विस्कळीत झाला. शुक्रवारी दाट धुक्यामुळे त्यांच्या हेलिकॉप्टरला ताहेरपूर हेलिपॅडवर सुरक्षित उतरणे शक्य झाले नाही आणि काही काळ थांबल्यानंतर ते कोलकाता विमानतळावर परतले. अधिकाऱ्यांनी सांगितले की खराब हवामानामुळे हा निर्णय घ्यावा लागला. दुपारी हेलिकॉप्टर ताहेरपूर हेलिपॅडजवळ घिरट्या मारत असताना धुक्यामुळे दृश्यक्षमता कमी होती. त्यामुळे पायलटने सुरक्षित लँडिंग न करता कोलकाता विमानतळावर परतण्याचा निर्णय घेतला. प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणा या काळात सतत हवामानाचे निरीक्षण करत होत्या.
 
 

 returned to Kolkata 
हवामान सुधारल्यास पंतप्रधान पुन्हा हेलिकॉप्टरने ताहेरपूरला पोहोचणार की रस्त्याने कार्यक्रमस्थळी जाणार, यावर विचार सुरू आहे. तसेच, पंतप्रधान रॅलीला व्हर्च्युअल पद्धतीने संबोधित करण्याचा पर्यायही ठेवण्यात आला आहे.तेहरपूर हेलिपॅडजवळ पंतप्रधानांची वाट पाहत लोकांचा मोठा जमाव पाहायला मिळाला. व्हिडिओंमध्ये रॅलीस्थळाभोवती आधीच उपस्थित समर्थक आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांची गर्दी दिसून आली. सकाळी सुमारे १०:४० वाजता पंतप्रधान मोदी कोलकाता येथे पोहोचले होते. ते कोलकातापासून सुमारे १०० किलोमीटर अंतरावर असलेल्या नादिया जिल्ह्यातील तेहरपूर येथे आयोजित रॅलीला उपस्थित होणार होते. योजनेनुसार, ते तेहरपूर येथे पोहोचून राज्यातील अनेक राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे उद्घाटन करणार होते आणि त्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या "परिवर्तन संकल्प सभे"मध्ये भाषण देणार होते. 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0