वॉशिंग्टन,
Barack Obama भारतीय संस्कृतीची आध्यात्मिक उंची आणि संत माऊलींचे विचार जगभरासाठी नेहमीच कुतूहलाचा विषय राहिले आहेत. मात्र, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या 13व्या शतकातील अद्भुत रचना ‘पसायदान’च्या प्रेमात पडल्याचे जाहीर केल्यावर भारतीय संस्कृतीचा जागतिक स्तरावर पुन्हा एकदा डंका वाजला आहे.
ओबामा यांनी Barack Obama 2025 वर्षातील त्यांच्या आवडत्या कलाकृतींची यादी जाहीर केली असून त्यात त्यांनी भारतीय तत्त्वज्ञानाचा गौरव केला आहे. माऊलींच्या शब्दांची मोहिनी फक्त एखाद्या धर्म किंवा प्रांतापुरती मर्यादित नसून, ती मानवतेसाठी एक सार्वत्रिक संदेश बनली आहे. गायिका गाणव्य यांनी ‘निलाम’ या अल्बममध्ये हे पसायदान अत्यंत भावपूर्ण आणि सात्विक स्वरांत गुंफले असून, त्याचे सौंदर्य ओबामांच्या हृदयाला भावले आहे.ओबामा यांनी ‘जे खळांची व्यंकटी सांडो’ या प्रार्थनेतील शांततेचा संदेश विशेषतः आवडल्याचे सांगितले. भारतीय अध्यात्माशी त्यांचे आत्मिक नाते अनेकदा चर्चेत आले आहे, आणि यावेळी त्यांचा पसायदानावर केलेला रसिकपणा हे भारताच्या सांस्कृतिक वारसाचा जागतिक स्तरावर मिळालेला गौरव ठरतो.
संगीताच्या बाबतीत ओबामांची Barack Obama आवड आंतरराष्ट्रीय पॉप आणि हिप-हॉप कलाकारांपर्यंतही आहे. लेडी गागा, केंड्रिक लामार आणि व्हिक्टोरिया नोएल यांसारख्या कलाकारांच्या तालावर डोलणाऱ्या जगात, माऊलींच्या शांत, अर्थपूर्ण आणि ध्यानमग्न करणाऱ्या शब्दांनी ओबामांना भुरळ घालणे ही भारतीय संस्कृतीची खरी ताकद ठरली आहे.ओबामा केवळ संगीतापुरतेच नव्हे, तर साहित्य आणि चित्रपटांमध्येही रसिक आहेत. त्यांच्या आवडत्या पुस्तके आणि चित्रपटांच्या यादीत ‘हॅमनेट’, ‘द सिक्रेट एजंट’ आणि ‘ट्रेन ड्रीम्स’ यांसारख्या कलाकृतींचा समावेश आहे. तथापि, या सर्वांमध्ये संत ज्ञानेश्वरांचा ‘पसायदान’ हा सर्वात तेजस्वी ठरला असून, एका महान भारतीय रचनेला जागतिक पटलावर मिळालेला गौरव हा प्रत्येक भारतीय, विशेषतः मराठी माणसासाठी अभिमानास्पद आहे.भारतीय संस्कृतीच्या या अद्भुत ठेव्याने पुन्हा एकदा जागतिक स्तरावर आपली छाप सोडली आहे आणि संत माऊलींच्या शब्दांनी जागतिक स्तरावर शांततेचा संदेश पोहोचवण्याचे सामर्थ्य अधोरेखित केले आहे.