सूर्यकुमार यादवचे कर्णधारपद जाणार?

20 Dec 2025 13:23:50
नवी दिल्ली,
Suryakumar Yadav will lose his captaincy भारत आणि श्रीलंका येथे होणाऱ्या २०२६ च्या टी-२० विश्वचषकासाठी टीम इंडियाची घोषणा आज, शनिवार २० डिसेंबर रोजी करण्यात येणार आहे. मुंबईतील बीसीसीआय मुख्यालयात अजित आगरकर यांच्या अध्यक्षतेखाली निवड समितीची महत्त्वाची बैठक होणार असून, या बैठकीत विश्वचषकासाठी भारतीय संघ निश्चित केला जाईल. गेल्या काही महिन्यांतील टी-२० सामन्यातील खेळाडूंच्या कामगिरीवरून संघाची निवड तुलनेने सोपी होणार आहे, मात्र कर्णधार सूर्यकुमार यादवच्या खराब फॉर्ममुळे निवड समितीवर दबाव निर्माण झाला आहे. त्यामुळे सूर्यकुमारच्या कर्णधारपदाबाबत कोणताही मोठा निर्णय घेण्यात येईल का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
 
Suryakumar Yadav
 
शनिवारी होणाऱ्या बैठकीत पाचही निवड समिती सदस्य उपस्थित राहणार आहेत, तसेच विद्यमान कर्णधार सूर्यकुमार यादव देखील सहभागी होऊ शकतो. बैठकीनंतर दुपारी १.३० वाजता अजित आगरकर पत्रकार परिषदेच्या माध्यमातून संघाची अधिकृत घोषणा करतील. संघाच्या घोषणेच्या एक दिवस आधी भारत आणि दक्षिण आफ्रिकामधील शेवटच्या टी-२० सामन्यात सूर्यकुमार यादवची कामगिरी अपयशी ठरल्यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अहमदाबादमध्ये झालेल्या सामन्यात भारताने ३० धावांनी विजय मिळवला, मात्र सूर्यकुमार फक्त ७ चेंडूत ५ धावा करून माघार झाला. संपूर्ण मालिकेत त्याने ४ डावांत केवळ ३४ धावा केल्या, तर २०२५ मध्ये २१ डावांत सरासरी १३.६२ आणि स्ट्राइक रेट १२३ ने केवळ २१८ धावा केल्या, एकही अर्धशतक झळकावता आले नाही. यामुळे कर्णधारपदावर प्रश्न उपस्थित झाला आहे.
 
 
निवड समिती काही धक्कादायक निर्णय घेईल का, किंवा हार्दिक पांड्याला पुन्हा नेतृत्वाची संधी मिळेल का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तथापि, प्रशिक्षक गौतम गंभीर आणि अजित आगरकर यांच्या भूमिकेवरून असे दिसते की वर्ल्डकप जवळ आला असल्यामुळे सूर्यकुमार यादवला कर्णधारपदी कायम ठेवण्याची शक्यता अधिक आहे. पीटीआयच्या वृत्तानुसार, सूर्यकुमार यादवची कर्णधारपदाची कारकीर्द फक्त या टी-२० विश्वचषकापुरती मर्यादित राहू शकते. त्याचा सध्याचा फॉर्म आणि वाढती वय ही त्यामागची मुख्य कारणे आहेत. सध्या तो ३५ वर्षांचा असून, पुढील टी-२० विश्वचषकाच्या वेळी ३७ वर्षांचा होईल. संघातील इतर खेळाडूंमध्ये उपकर्णधार शुभमन गिलवरही दबाव आहे. याने टी-२० आंतरराष्ट्रीयमध्ये एकही अर्धशतक झळकावलेले नाही. यामुळे संजू सॅमसन प्लेइंग-११ बाहेर बसला तर यशस्वी जयस्वालाला संघात स्थान मिळत नाही. तरीही, शुभमन गिलला संघाबाहेर ठेवण्याची शक्यता कमी आहे. तसेच नितीश कुमार रेड्डी, रिंकू सिंग आणि मोहम्मद सिराज यांना मुख्य संघाऐवजी राखीव खेळाडूंच्या भूमिकेत सामावले जाऊ शकते.
टीम इंडियाचा संभाव्य संघ:
सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, जितेश शर्मा (यष्टिरक्षक), संजू सॅमसन (यष्टिरक्षक), शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंग.
Powered By Sangraha 9.0