ग्राहक संरक्षण कायदा ग्राहक हितासाठी : अ‍ॅड. भन्साली

20 Dec 2025 17:12:48
कारंजा लाड,
Bhansali ग्राहक संरक्षण कायदा हा ग्राहकांच्या हितासाठी असून फसवणूक झाल्यास ग्राहकांना ग्राहक संरक्षण कायद्यानुसार ग्राहक न्यायालयात दाद मागता येते. बाजारपेठेत ग्राहकांचे हक्क, तक्रार निवारण प्रक्रिया, ऑनलाइन व्यवहारातील सावधगिरी तसेच कायद्याने दिलेले संरक्षण या विषयी सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच उपस्थितांनी विचारलेल्या प्रश्नांना अ‍ॅड. पवनकुमार भन्साली यांनी दिलखुलास उत्तरे देऊन शंकांचे समाधान केले.
 

Bhansali 
अखिल भारतीय ग्राहक पंचायत शाखा कारंजा इन्नानी महाविद्यालय, कारंजा यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय ग्राहक पंढरवाड्यानिमित्त शनिवार २० डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता महाविद्यालयाच्या सभागृहात बदलत्या बाजारपेठेत ग्राहकांचे हक्क, तक्रार निवारण प्रक्रिया, ऑनलाइन व्यवहारातील सावधगिरी तसेच ग्राहक कायद्याने दिलेले संरक्षण अर्थात ग्राहक संरक्षण कायदा या विषयावर वाशीम येथील ज्येष्ठ वकील अ‍ॅड. पवनकुमार भन्साली यांचे व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य पाटील तर प्रमुख अतिथी म्हणून अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे विदर्भ प्रांत संघटनमंत्री अभय खेडकर, जिल्हा मार्गदर्शक सुधीर देशपांडे व प्रा.अतुल बर्डे व्यासपीठावर उपस्थित होते.
जिल्हा मार्गदर्शक सुधीर देशपांडे यांनी आपल्या प्रास्ताविकात कार्यक्रमाची रुपरेषा विषद केली. तर प्राचार्य पाटील यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात अखिल भारतीय ग्राहक पंचायत ही संघटना कशी निर्माण झाली याबाबत सखोल मार्गदर्शन केले. तसेच ग्राहक आणि विक्रेता यांच्यातील संबंध कसे असावे याबाबत देखील माहिती दिली.
पुढे बोलताना ग्राहक संरक्षण कायदा निर्मिती आणि वापर या बाबत देखील मार्गदर्शन केले.तसेच ग्राहकांनी ऑनलाईन खरेदी करताना होत असलेली फसवणूक टाळण्यासाठी सजग राहण्याचे आवाहन केले. शिवाय ग्राहक संरक्षण कायदा शेतकर्‍यांसाठी प्रभावी वापरता आला तर अधिक चांगले होईल. असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन प्रा.पराते यानी केले तर आभार प्रा.अतुल बर्डे यांनी मानले.
 
 
कार्यक्रमाला अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे तालुका अध्यक्ष विजय पाटील काळे,उपाध्यक्ष प्रवीण वानखडे, सचिव प्रफुल बानगावकर, कोषाध्यक्ष अनंत सुपनर, सुनील फुलारी, मनीष भेलांडे, प्रसन्न पळसकर, नीता लांडे,रेणुका राऊत यांच्यासह महाविद्यालयीन प्राध्यापक वृंद व विद्यार्थी उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0