चार नगर परिषद व एका नगर पंचायत अध्यक्ष व सदस्यपदासाठी मतमोजणी उद्या

20 Dec 2025 17:01:05
वाशीम, 
There is widespread anticipation regarding the results. वाशीम जिल्ह्यातील चार नगर परिषद व एका नगर पंचायतीच्या अध्यक्ष व सदस्यपदासाठी उद्या, २१ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार असून, मतदारासह, त्या त्या पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्त्यामध्ये निकालाबाबत उत्सुकता लागली आहे. वाशीम जिल्ह्यातील रिसोड, मंगरुळनाथ, कारंजा नगर परिषद व मालेगाव नगर पंचायतसाठी २ डिसेंबर रोजी मतदान घेण्यात आले तर वाशीम नगर परिषदसाठी २० डिसेंबर रोजी मतदान घेण्यात आले. या सर्वांचा निकाल एकत्रीत २१ डिसेंबर रोजी त्या त्यात शहराच्या ठिकाणी लागणार आहे. त्यासाठी प्रशासनाने संपुर्ण तयार केली आहे. मतमोजणी केंद्र व केंद्राबाहेर पोलिसांचा चोख बंदोबस्त लावला आहे. सकाळी ८.३० वाजता पासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. दुपार पर्यंत सर्व नगर परिषद व नगर पंचायतचे निकाल जाहीर होण्याची शयता आहे. निकाल काय लागणार यापेक्षा आपलाच उमेदवार विजयी होणार असे गृहीत धरुन उमेदवार, त्या त्या पक्षाचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते निकालाकडे डोळे लावून बसले आहे.
 
 
Election
 
नगर परिषद व नगर पंचायत निवडणुकांसाठी सरासरी ६५ टक्के एवढे मतदान झाले. त्यात रिसोड नगर परिषदेसाठी ७० टक्के मतदान झाले. रिसोड व वाशीम नगर परिषदमध्ये मशाल व कमळ या चिन्हातच लढत झाल्याचे मतदारातील चर्चेतून समोर आले तर मंगरुळनाथमध्ये घड्याळ व कमळ यांच्यात चुरशीचा सामना झाला. कारंजा नगर परिषदमध्ये एमआयएम व भाजपा यांच्यात चुरशीची लढत झाली. मालेगाव नगर पंचायतमध्ये पंजा, धनुष्य व कमळ असा तिरंगी सामना झाला. जिल्ह्यातील चार नगर परिषद व एक नगर पंचायत ची मतमोजणी आज, २१ डिसेंबरला पार पडणार आहे. त्यामुळे या निकालाकडे राजकीय मातब्बर व मतदारांचे लक्ष लागले आहे. मतमोजणीच्या ठिकाणी प्रशासकीय यंत्रणा सज्ज असून, चोख पोलिस बंदोबस्त लावला आहे.
Powered By Sangraha 9.0