नागपूर सेवा केंद्रांना भेट व व्हीलचेअर देणगी

20 Dec 2025 17:40:43
नागपूर,
Nagpur service center राष्ट्रीय स्वयंसेवक संघ लोककल्याण समिती, अजनी भाग अंतर्गत कार्यरत असलेले सेवा केंद्र- स्व. सदाशिव गोविंद कात्रे फिजिओथेरपी केंद्र तसेच स्व. श्री सूर्यनारायणराव रुग्ण साहित्य सेवा केंद्र- हे पीएमजी वसाहत, सिद्धिविनायक गणेश मंदिर परिसर, नरेंद्र नगर, नागपूर येथे समाजसेवेच्या भावनेतून कार्यरत आहेत. या दोन्ही सेवा केंद्रांना सामाजिक दायित्वाच्या दृष्टिकोनातून जयंत व्यास व सुजाता व्यास यांनी भेट दिली.
 
 
Nagpur service center
 
त्यांनी सेवा केंद्रात सुरू असलेल्या विविध उपक्रमांची माहिती घेऊन समाधान व आनंद व्यक्त केला. यावेळी सेवा भावनेतून त्यांनी रुग्ण साहित्य सेवा केंद्रासाठी रुग्णांच्या सेवेसाठी दोन नवीन व्हीलचेअर भेट म्हणून दिल्या. Nagpur service center यावेळी नरेंद्र नगर संघचालक डॉ. प्रसाद वडदडकर, भाग सेवाप्रमुख प्रकाश तांबोळी, प्रकल्प प्रमुख दिलीप परसोडकर, विक्रांत (श्याम) घाटे, योगेश मेडसिंगे तसेच सेवा प्रकल्पाच्या डॉ. सुहासिनी काळबांडे उपस्थित होते.
सौजन्य: संजय श्रौती, संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0